BJP Central Election Committee meeting at the party headquarters in Delhi discussion on Mahayuti Seat Sharing In Maharashta devendra fadnavis ajit pawar eknath shinde

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Mahayuti Seat Sharing In Maharashta) राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा घोळ अजूनही सुरुच आहे. शिंदे आणि अजित पवार गट जागावाटपात नाराज असतानाच आज (11 मार्च) भाजपची दिल्लीत बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील जागांवर पहिल्यांदा चर्चा झाल्याचे समजते. कोल्हापूरसाठी समरजित घाटगे यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही जागा शिंदे गटाने न सोडल्यास धनुष्यबाण चिन्हाचाही विचार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून समजते. तसेच पुण्यातून मुरलीधर मोहोळ आणि पंकजा मुंडे यांच्या नावावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून पंकजा यांना संधी दिली जाणार का? अशीही चर्चा आहे. अनेक जागांवर उमेदवार बदलण्याचा सल्ला दोन दिवसापूर्वी बैठक झाली होती तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला होता. यानुसार बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्रातील जागांवर चर्चा करण्यात आली. यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीत सामील होतील. या बैठकीपूर्वी कोअर बैटकीत चर्चा करण्यात आली. 

कोल्हापुरातून समरजीत घाटगेंना रिंगणात उतरवण्याची तयारी भाजपची आहे. एकनाथ शिंदेंकडून जागा सोडली नाही तर घाटगे शिवसेनेचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आहे.  सांगलीत संजयकाका पाटील यांनाच उमेदवारी देण्याची चिन्हे आहेत. असे झाल्यास त्याठिकाणी चंद्रहार पाटील विरुद्ध संजयकाका पाटील लढत असेल. पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा आहे. मुंडे भगिनींपैकी कोण उमेदवार असणार याची चर्चा संपूर्ण राज्यभरात असून बीडमधून प्रीतम मुंडेंना ब्रेक दिला जाऊ शकतो. त्याठिकाणी पंकजा मुंडे या लोकसभेच्या नव्या उमेदवार असू शकतात.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts