Pune lOksabha electin 2024 Murlidhar Mohol instagram post gone viral jalne vale ko badato hamjtrend me hai

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी (Pune loksabha 2024)  महायुतीकडून जागावाटपाची चर्चा सुरु आहे. अनेक बैठका घेतल्या जात आहेत. त्यातच पुणे आणि बारामतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपकडे इच्छूकांची मोठी रांग आहे. त्यातच पुण्यातील भाजपच्या इच्छूकांनी सोशल मीडियावर आपला प्रचार करायला सुरुवात केल्याचं दिसत आहे. सोबतच विकास कामांचा आढावादेखील सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. भाजपने लोकसभेची संभाव्य यादी जाहीर केली. त्यात पुण्यासाठी मुरलीधर मोहोळ  (Murlidhar Mohol) यांचं नाव आहे. त्यांनीदेखील सोशल मीडियावरुन आपल्या कामाचा आढावा शेअर करायला सुरुवात केली आहे. 

‘जलने वालो को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग मे आ रहै है’, अशा आशयाचा व्हिडीओ मुरलीधर मोहोळांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यातून त्यांनी त्यांच्या विरोधकांना इशारा दिला आहे. भाजपची संभाव्य यादी जाहीर होताच मुरलीधर मोहोळांच्या विरोधात भाजपनेच बॅनर बाजी केली होती. स्टॅंडिंग दिली , महापौर केलं , सरचिटणीस पण दिलं. आता खासदारकी पण? आता बास झालं तुला नक्की पडणार, अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी या बॅनरवर बोलताना रात गई बात गई, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र सोशल मीडियावरुन ‘जलने वालो को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग मे आ रहै है, असा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी भाजपलाच इशारा दिलाय का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मागील काही दिवसांपासून पुणे भाजपमध्ये अंतर्गत धूसफूस सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक कार्यक्रमात ही धूसफूस दिसून आली होती. त्यातच भाजपतील नेत्यांमध्येच इव्हेंट वॉरदेखील बघायला मिळाला होता. मात्र हा वाद यापूर्वी उघडपणे समोर आला नव्हता. मात्र थेट महापालिकेत बॅनरबाजी करत हा वाद भाजपच्याच कार्यकर्त्यांनी समोर आणला होता. या बॅनरची माहिती मिळताच महापालिकेकडून हे बॅनर हटवण्यात आलं होतं.

मुळीक की मोहोळ?

दरम्यान,भाजप नेत्या मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवण्यात आल्यानंतर जगदीश मुळीक यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र, या भाजपच्या संभाव्य यादीत मुरलीधर मोहोळ यांचं नाव आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळांची नियुक्ती करण्यात आली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ते सक्रियपणे होते. या निवडणुकीदरम्यान अनेक नेत्यांनी मतदारसंघाचे दौरे केले. केंद्रीय मंत्री अमित शाहांनी सुद्धा देखील मतदारसंघाचा दौरा केला होता. आता पुण्य़ात मोहोळ कि मुळीक नेमकं कोणाला उमेदवारी मिळते, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.


इतर महत्वाची बातमी-

Pune Loksbha Election 2024 : पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळांचं नाव? पुण्याचे ‘अण्णा’ ते लोकसभेचे उमेदवार, कोण आहेत मुरलीधर मोहोळ?

 

 

 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts