( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ketu Retrograde 2023 : ऑक्टोबर महिन्यात केतू गोचर करणार आहे. केतूच्या गोचरमुळे 12 राशींवर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रात केतूला मायावी ग्रह मानलं जातं. राहुप्रमाणेच केतूकडेही कोणत्याही राशीचं स्वामित्व नाही. तर दुसरीकडे शनिवार 17 जून रोजी शनीची रास बदलणार आहे. शनी आपल्या मूळ राशीत कुंभ राशीत पुढील 6 महिने वक्री होणार आहेत. अशा परिस्थितीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत शनीच्या बरोबरीने आणखी 2 ग्रहही प्रतिगामी गतीने फिरणार आहेत.
पुढचे 6 महिने 3 ग्रहांची वक्री चाल पहायला मिळणार आहे. ग्रहांच्या या प्रतिगामी गतीमुळे जून ते नोव्हेंबर या काळात काही राशींवर याचा चांगला परिणाम होताना दिसणार आहे. जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत.
मेष रास
केतूच्या गोचरमुळे मेष राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम पहायला मिळणार आहेत. ज्या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नवीन नोकरी मिळू शकणार आहे. विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित केलं तर त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळणार आहेत. उत्पन्नाचे साधन वाढणार आहे. कुटुंबामध्ये काही अडचणी असतील तर त्या दूर होऊन प्रेम वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी शत्रू ठरवूनही तुम्हाला त्रास देऊ शकणार आहे.
कर्क रास
सध्या कर्क राशीचे लोक शनीशी झुंजत आहेत. या राशीच्या आठव्या घरात शनी विराजमान आहे. मात्र यामध्ये केतू तुम्हाला शुभ परिणाम देणार आहे. यावेळी बिघडलेले नातेसंबंध सुधारणार आहेत. तर नवीन नातं जोडण्याचा तुम्ही विचार करू शकता. या काळामध्ये तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
धनु रास
केतूच्या प्रभावामुळे धनु राशीच्या लोकांना सुख-सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या काळामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता अधिक आहे. तसंच तुम्ही जमीन किंवा गाडी खरेदी करण्याचा करू शकता. समाजात नाव आणि मान-सन्मान वाढणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभही मिळू शकतो. शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला चांगलं यश मिळणार आहेत.
मकर रास
या राशींच्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य होणार आहे. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही परदेश प्रवासाचे योगही दिसून येताय. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. तुम्ही अविवाहित असाल तर लग्नाची शक्यता निर्माण झाली आहे.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )