Gautam Gambhir Criticized MS Dhoni For Hero Of World Cup Win ; धोनीला मीडियीने हिरो बनवला, गंभीरने जहरी टीका करत सांगितले विश्वविजयाच्या नायकाचे नाव

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारताने WTC Final गमावली आणि त्यानंतर काही जणांनी महेंद्रसिंग धोनीची स्तुती करायला सुरुवात केली. पण धोनीची स्तुती करणाऱ्या या सर्वांना आता भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने चांगलीच चपराक दिली आहे. त्याचबरोबर धोनीला मीडियाने हिरो बनवला पण विश्वविजयाचा नायक मात्र वेगळाच आहे, असे गंभीरने यावेळी स्पष्ट केले.गंभीर यावेळी म्हणाला की, ” धोनीला मीडियाने मोठा केला आहे. त्यामुळे ज्या खेळाडूने भारताला विजय मिळवून दिले, त्यांचे नाव पुढे येत नाही. फक्त धोनीचेच नाव विजयानंतर घेतले जाते. एका जनसंपर्क टीमने धोनीला हिरो बनवले आहे. कारण जेव्हा जेव्हा २००७ किंवा २०११ च्या विश्वचषकाचा विषय काढला जातो, तेव्हा धोनीनेच नाव घेतले जाते. कारण या जनसंपर्क टीमने धोनीच्या नावाची एवढी जाहीरात केली की लोकांच्या डोक्यात जेव्हा विश्वविजयाची गोष्ट येते तेव्हा फक्त धोनीचेच नाव समोर येते, पण हा विश्वचषक जिंकवून देणाऱ्या खेळाडूला मात्र तेवढी प्रसिद्धी नक्कीच मिळालेली नाही. त्यामुळे जो खरा हिरो आहे त्याच्यावर अन्याय झाला आहे.”

गंभीरने पुढे सांगितले की, ” भारताच्या २००७ आणि २०११ या विश्वविजयाचे श्रेय युवराज सिंगला द्यायला हवे. कारण या दोन्ही विश्वविजयांचा तो नायक होता. पण दुर्देवाने मला सांगावे लागते की, जेव्हा २००७ आणि २०११ च्या विश्वचषकाचा विषय निघतो तेव्हा कुठेच युवराजचे नाव आघाडीवर येत नाही. कारण ही गोष्ट मार्केटींगमुळे झाली आहे. जनसंपर्क टीमने धोनीचे एवढे मार्केटींग केले की त्याने एकट्यानेच विश्वचषक भारताला जिंकवून दिले, असे चाहत्यांच्या मनावर बिंबवण्यात आले आहे. कोणताही संघ कधीच एकट्या खेळाडूच्या जोरावर जिंकत नाही. त्यामुळे विश्वविजयासाठी जे फक्त धोनीचे नाव घेतले जाते, ते साफ चुकीचे आहे.”

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

विश्वविजय म्हटलं की काही जणांना फक्त धोनी आठवतो. पण धोनी हा कर्णधार होता आणि त्याला खेळाडूंची साथ मिळाल्यामुळेच संघाला विजय मिळवता आला हे काही जणं विसरताना दिसत आहेत.

[ad_2]

Related posts