Ravichandran ashwin reclaims number 1 position from jasprit bumrah in icc mens test bowling rankings ICC Test Rankings marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ICC Test Rankings : भारतीय ऑफ स्पीनर गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आयसीसी टेस्ट रँकिंगमधील (ICC Test Rankings) पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. आयसीसीने बुधवारी जारी केलेल्या ताज्या रँकिगमध्ये टेस्ट गोलंदाजांच्या यादीत रविचंद्रन अश्विन अव्वल ठरला आहे. जसप्रीत बुमराहला मागे टाकत अश्विन सहाव्यांदा नंबर 1 टेस्ट गोलंदाज ठरला आहे. काही दिवसांपूर्वी धर्मशालामध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत अश्विनने 500 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.

आर अश्निन कसोटीमधील अव्वल गोलंदाज

रविचंद्रन अश्निनने अलिकडेच धर्मशालामध्ये इंग्लंड विरुद्धचा 100 वा टेस्ट सामना खेळला. या सामन्यात अश्विनने धमाकेदार खेळी केली होती. 100 व्या टेस्ट सामन्यात अश्विनने कसोटीच्या पहिल्या डावात 51 धावांत 4 बळी घेतले तर दुसऱ्या डावात 77 धावांत 5 फलंदाज बाद केले. भारताने हा सामना एक डाव आणि 62 धावांनी जिंकून मालिका 4-1 ने जिंकली.

टॉप 10 टेस्ट गोलंदाजांमध्ये तीन भारतीय गोलंदाज

आयसीसी टॉप 10 टेस्ट गोलंदाजांमध्ये तीन भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे. कसोटी गोलंदाजांच्या यादीत अश्विन 870 पॉईंट्ससह पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या नंतर दुसऱ्या स्थानावर 847 पॉईंट्ससह हेजलवुड आणि तिसऱ्या स्थानावर बुमराह असून त्याच्याकडे 847 पॉईंट्स आहेत. टॉप 10 गोलंदाजांच्या यादीत जडेजा सातव्या क्रमांकावर आहे.

अश्विन सहाव्यांदा कसोटीत अव्वल

आर अश्विन सहाव्यांदा आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या यादीत अव्वल ठरला आहे. 2016 मध्ये अश्विनने पहिल्यांचा आयसीसी क्रमवारीत नंबर 1 गोलंदाज बनला होता. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांपैकी शेवटच्या सामन्यात आर अश्विनने दोन्ही डावात नऊ विकेट घेतल्या होत्या. त्याने पहिल्या डावात 51 धावांत चार आणि दुसऱ्या डावात 77 धावांत 9 बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने 5 कसोटी सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली.

रोहित, यशस्वी आणि विराट टॉप-10 मध्ये

आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत टीम इंडियाचे तीन फलंदाज टॉप-10 मध्ये आहेत. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांना इंग्लंडविरुद्ध धर्मशाला येथे झालेल्या कसोटी सामन्यात क्रमवारीत चांगल्या फलंदाजीचा फायदा झाला आहे रोहित शर्मा आयसीसी क्रमवारी सहाव्या तर यशस्वी आठव्या क्रमांकावर आहे. तर वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर राहिलेला विराट कोहली आयसीसी क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असून टॉप 10 मध्ये कायम आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts