BJP Candidate list second list lok sabha Election Pritam Munde Gopal Shetty manoj kotak sanjay dhotre unmesh patil Hansraj Gangaram Ahir who did not get tickets in second list bjp candidates maharashtra politics marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची दुसरी यादी (BJP Candidate 2nd List) जाहीर केली आहे. भाजपने बुधवारी संध्याकाळी भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहिर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहिर करण्यात आला आहे.  चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. असं असलं तरी भाजपच्या काही नेत्यांची तिकीटे कापण्यात आली आहेत. पंकजा मुंडे यांनी बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. मात्र, प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. 

प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून पंकजा मुंडेंना उमेदवारी

भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे बहिण प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी देण्यात यावी, यासाठी आग्रही होत्या. तशी मागणीही त्यांनी पक्षाकडे केली होती. मात्र, पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी अशी, पक्ष नेतृत्त्वाची इच्छा होती. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे यांनाच बीडमधून उमेदवारी जाहीर करत प्रीतम मुंडें यांचं तिकीट कापलं आहे. 

5 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं

भाजपने प्रीतम मुंडे, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांच्यासह उन्मेश पाटील आणि संजय धोत्रे यांचं तिकीट कापलं आहे. भाजपने महाराष्ट्रात 5 विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे. यामध्ये, जळगावमध्ये स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आणि उन्मेश पाटील यांचं तिकीट कापलं आहे.  याशिवाय संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. 

मुंबईतील दोन विद्यमान खासदारांची तिकीटं कापली

मनोज कोटक (Manoj Kotak) आणि गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) या विद्यमान खासदारांना भाजपने दुसऱ्यांदा संधी न देता त्यांची तिकीटे कापण्यात आली आहेत. मुंबईतील दोन विद्यमान खासदारांची तिकीटं भाजपने कापली आहेत. मनोज कोटकचं तिकीट कापत ईशान्य मुंबईतून मीहिर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर भाजपने उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापलं आणि पीयुष गोयल (Piyush Goyal) यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. 

ना-ना करणाऱ्या दोघांना लोकसभेचं तिकीट

पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने लोकसभेचं तिकीट दिलं आहे. भाजपने बीडमधून पंकजा मुंडे यांना आणि चंद्रपुरातून सुधीरल मुनगंटीवार यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांनी लोकसभेवर जाण्यासाठी नकार घंटा दिली होती. पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेवर जाण्याची इच्छा नसल्याचं पक्षश्रेष्ठींना सांगितल्याची माहिती समोर आली होती. तर बीडमधून पंकजा मुंडे या प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही होत्या. मात्र, भाजपने ना-ना करणाऱ्या पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारी दिली आहे.

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts