उत्तन-विरार दरम्यान बांधणार सी-लिंक, सरकारची मान्यता

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी सुकर करण्यासाठी उत्तन ते विरार दरम्यान 24 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विरार ते पालघर दरम्यानच्या सागरी सेतूची व्यवहार्यता तपासण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे, अंधेरीसारख्या उपनगरापासून विरार, पालघरसारख्या शहरांपर्यंत पर्यायी मार्ग तयार करण्याच्या हालचाली  सुरू आहेत. त्यातूनच सागरी सेतूचा पर्याय पुढे आला असून राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) वरळी- वांद्रे सागरी सेतू बांधण्यात आला आहे.

आता दुसऱ्या टप्यात वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात वर्सोवा ते विरार या 42 किलोमीटर सागरी सेतूची आखणी एमएमआरडीएने सुरू केली होती.

मात्र मुंबई पालिकेने वर्सोवा- दहिसर- भाईंदर दरम्यान सागरी किनारा मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वर्सोवा- विरार सागरी सेतू मार्गातील वर्सोवा- उत्तन याट्प्प्यातील सागरी सेतू रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी उत्तन ते विरार दरम्यान 24.25 किलोमीटर  सागरी सेतू बांधण्यात येणार असून त्याला 10 किलोमीटर लांबीचा उत्तन जोड रस्ता, 2.5 किलोमीटर लांबीचा वसई जोडरस्ता आणि 17.87 किलोमीटर लांबीचा विरार जोडरस्ता असेल. 


हेही वाचा

रिंगरूटने विरार आणि अलिबाग गाठणे सोपे होणार


लवकरच मुंबई-नागपूर दरम्यानचा प्रवास 8 तासात पूर्ण होणार




[ad_2]

Related posts