sexual harassment, संतापजनक! ऑफिसात अल्पवयीन मुलीसोबत घाणेरडे कृत्य, ६८ वर्षीय सिनियर वकिलाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल – crime news a senior advocate sexually exploited minor girl his office video goes viral

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मेरठ: मेरठमधील एका ज्येष्ठ वकिलाचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये वकील आपल्याच अल्पवयीन कार्यालयीन मुलीसह आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. वकिलाचा हा व्हिडिओ व्हायरल होताच मेरठ कोर्टाच्या संपूर्ण बार असोसिएशनमध्ये खळबळ उडाली आहे. पीडितेने वकिलाविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर पीडित मुलगी बेपत्ता झाली. वरिष्ठ वकिलाच्या या लज्जास्पद कृत्यावर कारवाई करत मेरठ बार असोसिएशनने त्यांचे सदस्यत्व रद्द केले.अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य

मेरठ बार असोसिएशनचे वरिष्ठ अधिवक्ता रमेश चंद गुप्ता (वय ६८ वर्षे) हे बार असोसिएशनमध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर आहेत. वकील रमेश चंद यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओसोबत काही अश्लील फोटोही व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये वकील रमेश गुप्ता हे त्यांच्याच कार्यालयात एका अल्पवयीन मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. इतकंच नाही तर व्हिडिओ कॉलवर या तरुणीसमोर अश्लील कृत्य करणारा व्हिडिओही समोर आला आहे.

एकेकाळी फूटपाथवर भजी, स्टेशनवर विकायचे साड्या, आज चांद बिहारी चालवतात कोट्यवधींचा व्यवसाय
मेरठ बार असोसिएशनने उचलली कठोर पावले

मेरठ बार असोसिएशनचे अध्यक्ष केपी शर्मा यांनी मेरठ बार असोसिएशनच्या व्यवस्थापकीय समितीची तातडीची बैठक बोलावली. बैठकीत वकिलाने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून केलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर चर्चा झाली. यामध्ये त्यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि अधिवक्ता रमेश गुप्ता यांना त्यांच्या पदावरून हटवून त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली.

तक्रारीनंतर मुलगी बेपत्ता

अधिवक्ता रमेश चंद गुप्ता यांचा व्हिडिओ ज्या मुलीसोबत व्हायरल झाला होता ती मुलगी २७ मे पासून बेपत्ता होती. २७ मे रोजी मुलीच्या चुलत भावाने अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. ३१ मे रोजी अपहरण झालेल्या तरुणीने बार अध्यक्षांची भेट घेऊन तक्रार केली. तक्रारीनंतर मुलगी बेपत्ता झाली. मुलीने बारच्या अध्यक्षांनाही तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत पत्र लिहिलं होतं. ज्येष्ठ वकिलावर गंभीर आरोप करण्यात आले. पेपरमध्ये जाहिरात देऊन ही तरुणी वकिलाच्या ठिकाणी कामाला आली होती, असे सांगण्यात येत आहे.

४ हात, ४ पाय, २ हृदयं आणि १ डोकं… छपराच्या नर्सिंग होममध्ये एका विचित्र बाळाचा जन्म, पाहायला लोकांची गर्दी
तरुणीने वकिलावर गंभीर आरोप केले

वकिलावर गंभीर आरोप करत वकिलाने तिच्या लेखी तक्रार पत्रात म्हटले आहे की, वकिलाने तिला कोल्ड्रिंक देऊन गैरवर्तन केले. इतकेच नाही तर त्याने अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ बनवले. त्यानंतर वकिलाने या अश्लील फोटो आणि व्हिडिओद्वारे तिला वारंवार ब्लॅकमेल केले. मुलीने पत्रात असेही लिहिले आहे की, दुसऱ्या शनिवारी वकिलाने तिला आपल्या कार्यालयात बोलावले आणि तिला नशायुक्त कोल्ड्रिंक देऊन बेशुद्ध केले. अयोग्य पद्धतीने फोटो काढले. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिचे कपडे अस्ताव्यस्त झालेले होते. यानंतर वकिलाने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. नकार दिल्यावर तो फोटो व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी हा वकील देत असे.

Cabinet Decisions: मंत्रिमंडळाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल; वाचा महत्त्वाचे निर्णय एका क्लिकवर
वकील निघाले भाजप नेत्याचे नातेवाईक

अधिवक्ता रमेश चंद गुप्ता हे भाजप नेते आणि पदाधिकाऱ्याचे नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच पोलीस गुप्ता हे वकील तसेच भाजप नेत्याचे नातेवाईक असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. नंतर पीडितेच्या वडिलांनी बारमध्ये तक्रार करून कारवाईची मागणी केली, त्यानंतर वकिलामार्फत कारवाई करण्यात आली, मात्र मुलीवर व तिच्या कुटुंबीयांवर तडजोडीचा दबाव सातत्याने केला जात आहे.

[ad_2]

Related posts