ipl 2024 parthiv patel said mumbai indians wanted to drop jasprit bumrah in 2015 rohit sharma

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jasprit Bumrah IPL 2024 : बूम बूम जसप्रीत बुमराह जगातील सर्वात घातक गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. कसोटी असे अथवा वनडे किंवा टी 20 जसप्रीत बुमराह भेदक गोलंदाजी करतो. जसप्रीत बुमराह सध्या जगातील आघाडीचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाचा सदस्य आहे. 2015 पासून बुमराह मुंबईचा भाग आहे. जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स संघाचा महत्वाचा सदस्य आहे. पण मुंबई इंडियन्स 2013 मध्ये जसप्रीत बुमराहला बाहेरचा रस्ता दाखवणार होतं. पण त्यावेळी रोहित शर्मामुळे मुंबईने जसप्रीत बुमराहला संघात कायम ठेवलं होतं. रोहित शर्मानं जसप्रीत बुमराहवर विश्वास दाखवला. कर्णधार रोहित शर्माचा विश्वास जसप्रीत बुमराहनं सार्थ ठरवला. 

रोहितमुळे जसप्रीत बुमराहचं करियर झालं – 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पार्थिव पटेल यानं जिओ सिनेमावर जसप्रीत बुमराह याच्याबद्दल वक्तव्य केले. पार्थिव म्हणाला की, “मुंबई इंडियन्सचा टीम मॅनेजमेंट 2015 मधील जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर समाधानी नव्हतं. त्यावेळी त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला होता. पण रोहित शर्मानं जसप्रीत बुमराहवर विश्वास दाखवला. त्यामुळे मुंबईने त्याला संघात कायम ठेवलं. “

जसप्रीत बुमराह याला रोहित शर्मामुळे मुंबईच्या संघात खेळण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्स जसप्रीत बुमराहला आयपीएल हंगाम सुरु असतानाच बाहेरचा रस्ता दाखवणार होतं. पण रोहित शर्मानं बचाव केला. दरम्यान, याबाबत रोहित शर्मा अथवा जसप्रीत बुमराह यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आले नाही.

पदार्पणात फक्त दोन सामने खेळला बुमराह – 

बुमराहने 2013 आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानं पदार्पणात आरसीबीविरोधात तीन विकेट घेतल्या होत्या. विराट कोहली, मयांक अग्रवाल आणि करुन नायर यांना बाद केले होते. 2013 मध्ये जसप्रीत बुमराह फक्त दोन सामने खेलले होता. 2014 मध्ये जसप्रीत बुमराह 11 सामने खेळला त्यात त्याला फक्त पाच विकेट घेता आल्या. 2015 मध्ये बुमराह चार सामने खेळला, त्यामध्ये तीन विकेट घेता आल्या. त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या करियरचा ग्राफ वाढत गेला. 2016 मध्ये जसप्रीत बुमराहने 14 सामन्यात 15 विकेट घेतल्या. 

जसप्रीत बुमराहचं शानदार कामगिरी – 

जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये आतापर्यंत 120 सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने 145 विकेट घेतल्या. 10 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट ही बुमराहची सर्वोच्च कामगिरी आहे.   2022 मध्ये बुमराहने 14 सामन्यात 15 विकेट घेतल्या. 2021 मध्ये 14 सामन्यात 21 विकेट घेतल्या. 200 मध्ये बुमराहने 27 विकेट घेतल्या होत्या. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts