yuvraj singh on hardik pandya replacing rohit sharma as mumbai indians captain ipl 2024 indian premier league

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2024 : यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबईची (Mumbai Indians) धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला (Rohit Sharma)हटवत हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवलं. त्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली होती.  चाहत्यांसोबत अनेक आजी-माजी खेळाडूंनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता यामध्ये युवराज सिंह (Yuvraj Singh)  याचेही नाव जोडले. मुंबईने रोहित शर्माऐवजी हार्दिककडे कर्णधारपद दिल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. युवाराज सिंहच्या मते रोहित शर्माला मुंबईचं कर्णधारपद संभाळण्याची आणखी एक संधी द्यायला हवी होती. 

भारताचा माजी खेळाडू युवराज सिंह यानं आयपीएल 2024 च्याआधी स्टार स्पोर्ट्सवर मन की बात केली. युवराज सिंह यानं हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याच्या मुंबईच्या निर्णायाला स्ट्रेटजिक निर्णय असल्याचं सांगितलं. त्याशिवाय रोहित शर्मालाच कर्णधार म्हणून पाहायला आवडेल असेही सांगितलं. 

युवराज सिंह म्हणाला की, “रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधार असताना मुंबईला पाच वेळा आयपीएल चषक जिंकून दिलाय. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढण्याचा मोठा निर्णय घेतला. रोहित शर्माला आणखी एक संधी द्यायला हवी होती. यंदाच्या हंगामात रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवायला हवं होतं. यादरम्यान हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद द्यायला हवं होतं.”

17 वर्षात पहिल्यांदाच घडणार असं – 

आयपीएल 2024 आधी  कर्णधार म्हणून मुंबईने रोहित शर्माच्या जागी आता हार्दिक पांड्याची निवड केली. मगील 17 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यंदाच टीम इंडियाचा कर्णधार आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून दिसणार आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढल्याचा फटका मुंबईला बसलाय. सोशल मीडियावरुन त्यांचे फॉलोअर्स कमी झाले. त्याशिवाय चाहत्यांमध्येही प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येतेय. 

हार्दिक पांड्याकडे नेतृत्व 

आयपीएल 2024 आधी मिनी लिलाव पार पडला होता. त्याआधीच मुंबईने ट्रेड विंडोद्वारे हार्दिक पांड्याला कॅश डीलमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने दोन वर्षांत शानदार कामगिरी केली होती. गुजरातने 2022 आणि 2023 मध्ये फायनलमध्ये धडक मारली होती. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातला जेतेपदही मिळालं होतं. त्यामुळेच मुंबईने हार्दिक पांड्याची आयात केली. त्यानंतर त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं. 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts