Nilesh Lanke And Sharad Pawar meet Lanke Not Participate In Pawar Group Maharashtra Politics Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nilesh Lanke : आमदार निलेश लंके आणि शरद पवार भेट पक्षप्रवेश नाही, पवारांच्या विचारधारेवर काम करणार : निलेश लंके 
आमदार निलेश लंकेंनी शरद पवारांची पुण्यातल्या कार्यालयात भेट घेतली. आपण पवारांच्या विचारधारेचेच आहोत असं लंके म्हणाले. विचारधारा आणि पक्ष एकच आहे असंही लंके म्हणाले. तरीही पवारांच्या राष्ट्रवादीत थेट प्रवेश मात्र लंकेंनी केला नाही. अजित पवारांनी पक्षांतर बंदी कायद्याचा आधार घेत कारवाई केली तर पुढील सहा वर्षं निवडणूक लढण्यास अडचण येऊ शकते हे ध्यानात घेऊन लंकेंचा पक्षप्रवेश लांबलाय. आजच्या पत्रकार परिषदेत स्वतः लंके, शरद पवार, जयंत पाटील यापैकी कुणीही लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत आहेत असं बोललं नाही. कदाचित आमदारकीचा राजीनामा देऊन ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. 

[ad_2]

Related posts