Eknath Khadse : रावेर लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजयीची लढत होणार का? एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raksha Khadse vs Rohini Khadse : दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) उमेदवारांची दुसरी यादी (BJP Candidate List) जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण 20 जणांचा समावेश आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सून रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली. 

रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यासमोर शरद पवार गटाकडून सासरे एकनाथ खडसे किंवा भावजय रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर नाशिकला शरद पवार गटाची जळगावच्या (Jalgaon) बैठक झाली होती. यात रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा रावेर लोकसभा मतदारसंघाची (Raver Lok Sabha Constituency) आढावा बैठक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडली. यानंतर एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा निवडणुकीबाबत मोठा खुलासा केला आहे. 

मी निवडणूक लढणार नाही – एकनाथ खडसे 

एकनाथ खडसे म्हणाले की, मी माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढणार नाही. रोहिणी खडसे देखील निवडणूक लढणार नाहीत. त्या विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असतील. रावेरमध्ये 7 ते 8 जण इच्छुक आहेत. काही उमेदवारांची छाननी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष उमेदवाराची उद्या निवड करण्यात येणार आहे. अम्ही तोडीस तोड उमेदवार देणार आहोत. रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

मी विधानसभेची निवडणूक लढवणार – रोहिणी खडसे

रोहिणी खडसे म्हणाल्या की, मी मुक्ताई विधानसभा मतदारसंघाची विधानसभेची निवडणूक लढणार आहे. एकनाथ खडसे यांची तब्येत ठिक नाही. महिनाभरापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. आगामी निवडणुकीत मोठ्या संख्येने आम्ही जिंकून येऊ. मतदार महाविकास आघाडीसोबत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदींबाबत एकनाथ खडसेंची सावध भूमिका

दरम्यान, गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदी यांनी देशात काम केले आहे, असे भाजपचे नेते सांगतात. राज्यात भाजपला 45 पेक्षा जास्त जागा मिळतील, या भाजप नेत्यांच्या दाव्याबाबत तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न खडसे यांना विचारण्यात आला. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी बोलणे टाळले. खडसे यांनी म्हटले की, कोणी किती काम केले ते मला माहिती नाही. पण महाराष्ट्रातील जनतेमध्ये असंतोष आहे. मला देशाचे काही माहिती नाही. पण महाराष्ट्रात कापूस आणि सोयाबीनला भाव नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. राज्यातील असुरक्षिता वाढत आहे, असे त्यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी यांच्याबाबत बोलताना खडसेंनी घेतलेली सावध भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. 

आणखी वाचा 

Nilesh Lanke : वस्तादाचा पहिला डाव! शरद पवारांच्या भेटीनंतर बॅनर्स झळकले; निलेश लंकेंचा फडणवीस स्टाईलमध्ये सूचक इशारा, म्हणाले…

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts