onion prices Fall in Maharashtra farmers are getting hit agriculture news farmers

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Onion Price : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (onion Farmers) सध्या अडचणींचा सामना करत आहे. कारण सातत्यानं कांद्याच्या दरात चढ उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कुठं कांद्याला प्रतिकिलोला 1 रुपयांचा दर मिळतोय तर कुठं 15 ते 30 रुपयांचा दर मिळत आहे. काही ठिकाणी किलोला 35 रुपयांचाही दर मिळत आहे. दरात चढ उतार होत असल्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. 

दरम्यान, ज्या बाजारपेठेत कांद्याची आवक जास्त झाली, त्या बाजारपेठेत कांद्याला कमी दर मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडं ज्या बाजारपेठेत कांद्याची आवक कमी झालीय, त्या ठिकाणी कांद्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तर कांद्याच्या गुणवत्तेवरही दराचं गणित अवलंबून आहे. दरम्यान, देशात महागाई वाढू नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी सरकार आयात निर्यात धोरणात सातत्यानं बदल करत आहे. कांद्याच्या वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातलीय.  यामुळं कांद्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. दरम्यान, 31 मार्चनंतर कांद्यावरील निर्यातबंदी उठणार आहे. त्यामुळं 31 मार्चनंतर कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 

कोणत्या बाजारात कांद्याला किती दर? 

नागपुरातील कामठी मंडईत कांद्याची कमी आवक झाली. त्यामुळं तिथं कांद्याला प्रतिकिलो 25 रुपयांचा दर मिळाला आहे. कोल्हापुरातील पेठ वडगाव मंडईतही कांद्याची कमी आवक झाली, त्यामुळं तिथं 35 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री झाली. सोलापूरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं तिथं प्रतिकिलो कांद्याला किमान 1 रुपया ते 11 रुपयांचा दर मिळाला आहे. तर येवला बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलोसाठी 3 रुपये ते 15 रुपयांचा दर मिळाला आहे. पुणे बाजार समितीत कांद्याला किलोला 6 रुपये ते 12 रुपयांचा दर मिळाला आहे. तर पारनेर बाजार समितीत प्रतिकिलो कांद्याला 3 ते 17 रुपयांचा दर मिळत आहे. 

कांद्याचे दर नियंत्रीत करण्यासाठी सरकारची योजना काय?

दरम्यान, 31 मार्च 2024 नंतर सरकार कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यात येणार आहे. त्यामुळं 31 मार्चनंतर कांद्याचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. या पार्श्वभूमीवर दर वाढू नये म्हणून सरकारनं योजना आखलीय. 2023-24 मध्ये कांद्याच्या उत्पादनात घट होण्याच्या अंदाज आहे. त्यामुळं सरकार कांद्याचा बफर स्टॉक तयार करणार आहे. सध्या कांद्याचे भाव आटोक्यात असले तरी भविष्यासाठी केंद्र सरकारने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. कांद्याच्या संभाव्य भाववाढीवर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या:

31 मार्चनंतर कांद्यावरील निर्यातबंदी उठणार, दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारचा प्लॅन काय?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts