[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
लीगमधील सालेम स्पार्टन्सचा कर्णधार अभिषेक तंवर याच्या नावावर असा एक विक्रम झालाय जो तो कधीच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याने मॅचमधील अखेरच्या ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर १८ धावा दिल्या. क्रिकेटच्या इतिहासात एका चेंडूवर इतक्या धावा देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये ३६ धावा झालेल्या पाहिल्या आहेत. ओव्हरच्या सर्व चेंडूवर षटकार पाहिलेल्या क्रिकेट चाहत्यांना तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये असे काही तरी पहायला मिळाले जे कधीच घटले नाही. टीएनपीएल २०२३च्या दुसऱ्या मॅचमध्ये हा विक्रम झाला, जो अनेक वर्ष लक्षात ठेवला जाईल.
सालेम स्पार्टन्स आणि चेपॉक सुपर गिलिल यांच्यात झालेल्या सामन्यात स्पार्टन्सचा कर्णधार अभिषेक तंवरने २०व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर १८ धावा दिल्या. होय तुम्ही अगदी बरोबर वाचले, एका चेंडूवर चक्क १८ धावा. क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महाग चेंडू ठरला आहे. तर टी-२० क्रिकेटमधील अखेरच्या ओव्हरच्या सर्वात महाग अखेरचा चेंडू ठरला आहे. क्रिकेटमधील सर्वात महाग चेंडूचा विक्रम ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये झाला आहे. या लीगमध्ये एका चेंडूवर २० धावांचा विक्रम आहे. २०१३-१४ मध्ये क्लिंट मॅके या गोलंदाजाने १ चेंडूवर २० धावा दिल्या होत्या.
अभिषेकने २०व्या ओव्हरची सुरुवात बरी केली होती. पण अखेरच्या ओव्हरने सर्व काही वाया गेले. सुरुवातीच्या ५ चेंडूवर ८ धावा दिल्या होत्या. पण सहाव्या चेंडूवर त्याने संजय यादवला चेंडू टाकला जो एक शानदार यॉर्कर होता. या चेंडूवर संजय क्लीन बोल्ड झाला खरा पण त्यानंतर सर्व गोंधळ सुरू झाला. ज्या चेंडूवर अभिषेकने संजयला क्लीन बोल्ड केले तो नो बॉल होता. या चेंडूनंतर फलंदाजाने त्याच्याकडून बदलाच घेतला.
नो बॉलनंतर अभिषेकने फ्री हिटसाठी चेंडू टाकला पण तो देखील नो बॉल झाला आणि यावेळी संजयने कोणतेही चूक केली नाही. फ्री हिटवर षटकार मारला. त्यानंतर अभिषेकने टाकलेला पुढचा चेंडू देखील नो बॉल ठरला ज्यावर संजयने २ धावा काढल्या. आता आणखी एक फ्री हिटचा चेंडू होता जो अभिषेकने वाइड टाकला. अखेर कसे बसे अभिषेकने सहावा चेंडू योग्य पद्धतीने टाकला ज्यावर संजयने षटकार मारला. अशा पद्धतीने संजयने एका चेंडूवर १८ धावा केल्या.
असा टाकला गेला सहाव चेंडू
पहिला प्रयत्न- बोल्ड, नो बॉल
दुसरा प्रयत्न- षटकार, नो बॉल
तिसरा प्रयत्न- २ धावा, नो बॉल
चौथा प्रयत्न- वाइड
पाचवा प्रयत्न- षटकार
[ad_2]