World Cup 2023 IND Vs PAK World Cup Match Tickets Will Be Available On 3rd September

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs PAK Match Ticket : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. विश्वचषकातील भारतीय संघ आपल्या अभिनयाला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरोधात 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. विश्वचषक जसाजसा जवळ येतोय, तसतसे चाहत्यांचे लक्ष्य तिकिटांकडे लागलेय. त्यात भारत आणि पाकिस्तान सामन्याची उत्कंठा प्रत्येक चाहत्याला लागली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तिकिटांसदर्भात अपडेट समोर आली आहे.  

भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे कधी उपलब्ध होणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  वर्ल्ड कपसाठीची तिकिटे 25 ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहेत. तर अंतिम टप्प्यातील तिकिटे 5 सप्टेंबरपासून मिळणार आहेत. भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकिटे 3 सप्टेंबरपासून ऑनलाईन बूक करता येतील. बूक माय शो कंपनीला भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकिटे विकण्याचे अधिकार मिळू शकतात. 

टीम इंडियाच्या सामन्याची तिकिटे कधीपासून मिळणार ?

भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधात मैदानात उतरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत चेन्नई येथे होणार आहे. त्यानंतर रोहितच्या नेतृत्वातील टीम इंडिया 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये अफगाणिस्तानविरोधात दोन हात करणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यात लढत होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. इंग्लंडविरोधात भारतीय संघ 29 ऑक्टोबर रोजी दोन हात करणार आहे. या सर्व सामन्यांची तिकिटे 1 सप्टेंबर रोजी उपलब्ध होणार आहेत. 

विश्वचषक कधीपासून – 

भारतात होणारा विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत.  



[ad_2]

Related posts