घरातील जमिनीखालून येत होते गूढ आवाज, खोदकाम करताच बाहेर आले तीन हिंस्त्र प्राणी|Crocodiles Have Been Found Living Underground Terrifying video viral from india

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crocodiles Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तीन मगरी जमिनीखालून अचानक बाहेर पडल्याचे दिसत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ (Instagram Video) सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतातीलच ही घटना असल्याचे बोललं जात आहे. व्हिडिओपाहूनच अंगावर काटा येत आहे. (Crocodiles Have Been Found Living Underground )

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. असाच भारतातील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. साधारणतः मगरी या तलाव किंवा पाठवठ्याच्या जागी आढळतात. मात्र, कधी असं झालंय का की तुम्ही आरामात घरी बसले आहेत आणि अचानक तुमच्या घरातील जमिनीतून तीन तीन मगरी वर येऊन तुमच्या समोर बसल्या आहेत. अशीच एक घटना भारतातील एका राज्यात घडली आहे. याचा व्हिडिओही व्हायरल झाल्या आहेत. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत, एक मगर रस्ता फोडून बाहेर येताना दिसत आहे. तर, पायात गमबूट घातलेले लोक हातात शस्त्र घेऊन त्या मदतीने तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. एक मगर बाहेर आल्यानंतर तिच्या मागोमाग दोन आणखी मगर बाहेर येताना दिसत आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार, हा व्हिडिओ भारतातील एका राज्यातील आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाहीये. 

दरम्यान, या घरातील लोकांना जमिनीखालून गूढ आवाज येत होते. कोणीतातरी महाकाय जनावर जमिनीखाली भांडत  असल्याचा भास कुटुंबीयांना होत होता. मात्र, जमिनीखाली कोण असू शकतो कारण जमिनीवर प्लास्टर लावण्यात आले होते. आवाज हळहळू वाढत असताना एका ठिकाणाहून तुटलेल्या प्लास्टरच्या इथून खाली वाकून पाहिले तर त्यांना मोठा धक्काच बसला.

घाबरलेल्या रहिवाशांनी घाबरुन प्लास्टर तोडायला सुरुवात केली. त्यानंतर एकामागून एक तीन मगरी बाहेर आल्या. हा सर्व प्रकार पाहून रहिवाशांच्या अंगावरही काटा उभा राहिला. सर्वच जण बाहेर निघालेल्या मगरींवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करत होते. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर  @mksinfo.official अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे ज्यावर लाखो कमेंटही आल्या आहेत. काहींनी आतपर्यंत अजून खोदकाम करावे. आत अजून मगरी असण्याची शक्यता आहे. व या मगरी इथपर्यंत कशा आल्या, अशी कमेंट केली आहे. तर, एकाने जमीनीच्या आतून मगरी बाहेर येणे किती भयानक आहे, असंही एकाने म्हटलं आहे. 

Related posts