[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
बेकिंग सोडा वापरा
NCBI वर प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, बेकिंग सोडा दातांच्या पृष्ठभागावरील डाग काढून टाकण्यास मदत करतो तर हायड्रोजन पेरोक्साइड हे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे जे बॅक्टेरिया नष्ट करण्यात किंवा त्यांना मारून टाकण्यात मदत करते. एक चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड घ्या. दोन्ही चांगले मिक्स करा. नियमितपणे दात घासण्यासाठी या पेस्टचा वापर करा.
(वाचा :- Calcium च्या कमीने हलेल शरीरातील पूर्ण हाडांचा सांगाडा,दही-दूध सोडा, खा हे 10 पदार्थ, लोखंडाहून टणक होतील हाडे)
ऑईल पुलिंग करा
ऑईल पुलिंग ही भारतातील दात पांढरी करण्याची एक पारंपारिक पद्धत आहे. यामुळे तोंडातील सर्वच समस्यांचा त्रास संपूर्ण दूर होतो. ऑईल पुलिंगसाठी तोंडात तेल घेऊन ते चारी बाजूला फिरवावे लागते. तुम्ही ज्या पद्धतीने आपण चूळ भरतो तसेही करू शकता. यासाठी सूर्यफूल तेल, तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल वापरा. ऑईल पुलिंगसाठी, एक चमचा तेल घ्या आणि 15 ते 20 मिनिटे तोंडात घुसळा.
(वाचा :- वय 18 वर्ष राहण्यासाठी ब्रश करण्याआधी ही 1 गोष्ट पितो 45 वर्षाचा बिझनेसमन, आता दिसतो 21 वर्षाचा तरूण-फिट मुलगा)
केळी, संत्री किंवा लिंबूच्या साली चोळा
केळी, संत्री किंवा लिंबाची साल घ्या आणि हळूवारपणे दातांवर घासा. सुमारे 2 मिनिटे या सालीने दात चोळत राहा, नंतर आपले तोंड चांगले धुवा आणि दात घासून घ्या. या फळांच्या सालींमध्ये सायट्रिक ऍसिड असते, जे दात पांढरे करण्यास मदत करते.
(वाचा :- सावधान, भारतात Diabetes चा भयंकर विस्फोट, 10 करोड लोक बाधित, ही 5 कामं न केल्यास तुम्हीही होणार Sugar चे रूग्ण)
फळे आणि भाज्या खूप खा
फळे आणि भाज्या कुरकुरीत असतात आणि त्यांच्या सेवनाने दातांवरील हट्टी पिवळा थर काढून टाकण्यास मदत होते. अननस आणि स्ट्रॉबेरी ही दोन अशी फळे आहेत जी तुमचे दात पांढरे करू शकतात. रिसर्च गेट मधील अभ्यासानुसार, अननसमध्ये आढळणारे “ब्रोमेलेन” नावाचे एन्झाइम प्रभावीपणे डाग काढून टाकण्यास मदत करते.
(वाचा :- Cholesterol Cleansing Food: खा हे 10 पदार्थ, लघवी व शौचावाटे पडून जाईल नसांत चिकटलेलं मेणासारखं घाण कोलेस्ट्रॉल)
डेंटिस्टची मदत घ्या
वर सांगितलेल्या उपायांनीही तुम्हाला काही फरक पडत नसेल आणि तुमचे दात अधिकाधिक पिवळे होत असतील तर याबाबतीत डेंटीस्टची मदत घ्या. कधी कधी पिवळा थर इतका मजबूत झालेला असतो की कोणत्याही घरगुती उपायाने तो काढणे कठीण होऊन बसते.
(वाचा :- Lungs Cleaning Foods: फुफ्फुसातील विषारी घाण मुळासकट उपटून फेकतात हे 5 उपाय, प्रत्येक श्वास मिळतो गाळून व शुद्ध)
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
[ad_2]