Balasaheb Thackeray video tweet from Chandrashekhar Bawankule before Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra Criticism on Uddhav Thackeray marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रेचा (Bharat Jodo Nyay Yatra) आज मुंबईत (Mumbai) समारोप होणार असून, यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला असून, ज्यातून त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. सोबतच ‘उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का?’ असा खोचक टोलाही लगावला आहे. 

‘शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन’ असे वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले होते. त्यांच्या त्याच भाषणाची व्हिडिओ क्लिप चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून ट्विट करण्यात आली आहे. यावरून राहुल गांधींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.  

बावनकुळे काय म्हणाले?

शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे. शिवतीर्थ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असे समीकरण, यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता. याच शिवतीर्थावरून हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन,असे रोखठोक बजावणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारकही शिवतीर्थावर आहे. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन करीत नाहीत. तुम्ही का करीत नाहीत? असा प्रश्न विचारण्याचे धाडस उद्धव ठाकरे दाखवणार का? असा सवाल ट्वीटमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का? हा सामान्य शिवसैनिकांच्या मनातील प्रश्न आहे, असंही बावनकुळे म्हणाले. 

राहुल गांधींच्या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहणार…

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ इंडिया आघाडी आज मुंबईतून करणार आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा समारोपानिमित्त इंडिया आघाडीची जाहीर सभा छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे होत आहे. या सभेला इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, एम के स्टॅलिन, चंपई सोरेन, तेजस्वि यादव, फारूक अब्दुला असे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे याची जय्यत तयारी सध्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये करण्यात आलेली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

राहुल गांधी शिवतीर्थावर जाणार, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts