rohit sharma tells bcci secretary jay shah they need virat kohli at any cost in t20 world cup 2024 team

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकामध्ये टीम इंडियात विराट कोहलीला स्थान नसेल, या बातमीनं क्रीडा जगतात खळबळ माजवली होती. दिग्गज आजी-माजी क्रिकेटसरसह चाहत्यांनीही टीकेचा भडीमार केला होता. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विराट कोहलीची विश्वचषकातील आकडेवारीच टाकली होती. पण आता रोहित शर्माने विराट कोहलीसाठी फिल्डिंग लावली आहे. विश्वचषकात विराट कोहली हवाच, अशी भूमिका रोहित शर्माने बीसीसीआयपुढे मांडली आहे. यूएईमधील संथ खेळपट्टीवर विराट कोहलीला फलंदाजी करण्यास अडचण येते, त्यामुळे नव्या खेळाडूंना संधी देण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याचं प्रसारमाध्यमात समोर आले होते. आता रोहित शर्माच्या अल्टीमेटमनंतर बीसीसीआय विराट कोहलीबाबत काय निर्णय घेतेय? याकडे लक्ष लागलेय. 

भारताचे माजी खेळाडू किर्ती आझाद यांनी रोहित शर्माच्या अल्टीमेटमवर स्पष्ट शब्दात ट्वीटवर पोस्ट केले आहे. ते म्हणाले की, टी20 विश्वचषकात विराट कोहली कोणत्याही परिस्थितीमध्ये संघात हवाच आहे. असे रोहित शर्मानं बीसीसीआय सचिव जय शाह यांना स्पष्ट शब्दात सांगितलं. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय विराट कोहलीला टी 20 मध्ये घेण्याचा विचार करत नाही. कारण, मागील काही दिवसांमध्ये विराट कोहलीचा टी 20 मधील फॉर्म तितका चांगला नाही. 

नेमकं काय म्हणाले किर्ती आझाद ?
 
किर्ती आझाद यांनी एक्स (ट्वीटर) वर म्हटले की, “जय शाह सिलेक्टर नाहीत. विराट कोहलीला टी20 संघात स्थान मिळू नये, यासाठी त्यांनी अजित आगरकर यांना सांगितलं. जेणेकरुन आगरकर अन्य निवड समितीच्या सदस्यांना याबाबत तयार करतील. त्यासाठी अजित आगरकर यांना 15 मार्चपर्यंतचा वेळ दिला होता. अजित आगरकर स्वत: अथवा अन्य निवड समितीच्या सदस्यांना राजी करु शकले नाहीत.  जय शाह यांनी याबाबत रोहित शर्मा याच्यासोबतही चर्चा केली. पण रोहित शर्मानं विराट कोहली कोणत्याही परिस्थितीमध्ये संघात हवा, अशी भूमिका घेतली.  विराट कोहलीला टी 20 संघात स्थान मिळणार की नाही… याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येईल. पण मूर्खांनी निवड प्रक्रियेत सहभागी होऊ नये. “

टी 20 विश्वचषक कधीपासून सुरु होतोय ? 

यंदाचा टी 20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या महाकुंभाची सुरुवात 1 जूनपासून होणार आहे. यंदाच्या टी 20 विश्वचषकात 20 संघ सहभागी असतील. भारतीय संघ अ ग्रुपमध्ये आहे. या गटामध्ये पाकिस्तान, आयरलँड, कॅनाडा आणि यूएसए या संघाचाही समावेश आहे. भारतीय संघाचा सलामीचा सामना पाच जून रोजी होणार आहे. तर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे.  

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts