Mumbai 40 animals died in 2022-23 at byculla zoo mostly from heart disease

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहलयातील 47 प्राणी आणि पक्ष्यांच्या गेल्या वर्षभरात मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. यामध्ये तब्बल 30 प्राण्यांचा ह्रदयविकारामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 

प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचा अहवाल प्रसिद्ध

देशभरातील प्राणिसंग्रहायलयातील पक्षी आणि प्राणी यांच्याबाबतचा अहवाल नुकताच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्रसिद्ध केला आहे. यामध्ये 2022-23 या वार्षिक अहवालात कोणत्या प्राण्यांच कोणत्या आजारामुळे झाला याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये हृदयाचा झटका, श्वसनक्रिया बंद होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यांसारख्या विविध आजारांना बळी पडत असल्याची माहिती या अहवालातून देण्यात आली आहे. 

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

1 एप्रिल 2022 ते 30 एप्रिल 2023 या वर्षात राणीच्या बागेतील 47 प्राणी, पक्ष्यांच्या विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 30 प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहीती वार्षिक अहवालातून समोर आली आहे. प्राणी संग्रहालयातील पेंग्विन, वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे 13 जातींचे 84 सस्तन प्राणी, विविध पक्षी आहेत. 

तसेच एप्रिल 2022 ते एप्रिल 2023 या वर्षात 47 प्राण्यांचा मृत्यू झाला असून त्यात ठिपके असलेले हरीण, इमू, मॅकाक रीसस, सांबर, आफ्रिकन पोपट, कासव यांचा समावेश आहे. यातील 30 प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला. 

पक्ष्यांचाही समावेश

राणीबागेतील ज्या पशू आणि पक्ष्यांचा मृत्यू झाला, त्यामध्ये पोपट आफ्रिकन ग्रे, कॉकॅटियल बडेरिगर, सांबर हरण, बडेरिगर, मॅकॉ मिलिटरी, तीतर गोल्डन, भारतीय फ्लॅपशेल, कासव, गोल्डन जॅकल, इमू इत्यादी पक्षी आणि प्राण्यांचा समावेश आहे. वृद्धापकाळाने सर्वात कमी मृत्यू झाले आहेत. मात्र सर्वाधिक प्राण्यांचा मृत्यू या कारणांमुळे का होत आहे याची कारणमीमांसा अद्याप झालेली नाही. 

याआधी 2019-20 या वर्षात वीर जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात तब्बल 32 विविध प्रकारच्या प्राण्यांचा मृत्यू झाला होता. या अहवालाच पक्षी, सस्तन प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा लेखाजोखा मांडण्यात आला. त्यानुसार वर्षभरात 8 पक्षी, 17 सस्तन प्राणी आणि 30 सरपटणाऱ्या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. 


हेही वाचा


[ad_2]

Related posts