praniti shinde slams bjp narendra modi devendra fadanvis solapur lok sabha election maharashtra politics marathi news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे मंत्री आणि आमदार, खासदार यांचे काही कामच नाही, त्यामुळेच भाजपकडे मतं मागण्यासाठी मुद्दा नसल्याची टीका काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केली. पेट्रोल पंप, टीव्ही आणि व्हॉट्सअॅपवरही तेच दिसतात. सोलापूर लोकसभेसाठी (Solapur Lok Sabha Election)  त्यांच्याकडे उमेदवार नाही, मात्र आमचं ठरलंय असंही त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीकडून सोलापूरच्या उमेदवारीवर अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी त्या ठिकाणी प्रणिती शिंदे यांनाच उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झालंय. प्रणिती शिंदे यांना लोकसभेवर पाठवा आणि सोलापूरचे नाव देशात गाजू द्या असं आवाहन यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिदे (Sushilkumar Shinde) यांनी केलं. 

व्हॉट्सअॅप आणि टीव्हीवर पाहून माझ्यावर विश्वास ठेऊ नका

भाजपच्या विरोधात जे कोणी लढत आहेत , महाविकास आघाडीतील जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांची जबाबदारी आहे, ती ही लढाई आपण लढली पाहिजे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, घरोघरी जाऊन लोकांना आपण जागृत केलं पाहिजे. मी जबाबदारीने या ठिकाणी सांगू इच्छिते, टीव्ही आणि व्हाट्सअप बघून माझ्यावरती विश्वास ठेवू नका.पेट्रोल वरती पेट्रोल भरायला गेल्यानंतर ते दिसतात, व्हॉट्सअॅपवर ते दिसतात, टीव्ही ओपन केल्यानंतर ना देखील ते दिसतात. ही सगळ मायाजाल आहे.

महाराष्ट्राचा विश्वासघात, गुजरातला लाभ

घराघरात आपण सगळेजण गेलं पाहिजे. घराघरात लोक काँग्रेस पक्षाची वाट बघत आहे.सोलापूर लोकसभेमध्ये पाच आमदार भाजपाचे आहेत. मोदींनी दहा वर्षात लोकांचा विश्वासघात केला आहे. खाजगीकरण करून महाराष्ट्र गुजरातला चालवायला दिलं आहे का?

राम आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. जय श्रीराम म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात आपण कित्येक वर्षापासून राम राम म्हणतो, राम कृष्ण हरी म्हणतो. राम सगळ्यांना पाहिजे, पण रामा सोबत काम महत्त्वाचं आहे. धर्मासोबत कर्म महत्त्वाचे आहे.

भाजपकडे मतदानाचा मुद्दाच नाही

पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळमध्ये जाऊन बघा, जनावरांना पाणी नाही. तुमचा घास हिसाकावून घेण्याचं काम ते करत आहेत. पंतप्रधान, त्यांचे मंत्री, त्यांचे खासदार, त्यांचे आमदार, त्यांची महापालिका, त्यांची जिल्हा परिषद या ठिकाणी त्यांचं काहीही काम नाही. त्यामुळेच अजूनही भाजपकडे उमेदवार नाही. वेळ गेलेली नाही, आमचंही ठरलं आहे. भारतीय जनता पार्टीकडे मतदान मागायचा मुद्दाच नाही.

ही बातमी वाचा :

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts