ms dhoni chennai super kings cricket ltd donated aiadmk 5 crores in electoral bonds through india cements Sports News in Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Electoral Bonds: सध्या देशाच सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे, इलेक्टोरल बॉण्ड्स (Electoral Bonds). निवडणूक आयोगानं (Election Commission) इलेक्टोरल बॉण्ड्सचा तपशील सार्वजनिक झाल्यानंतर दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून कोणत्या कंपन्यांनी कोणत्या राजकीय पक्षांना निधी दिला, हे बॉण्ड्सच्या तपशीलावरूनही कळतं. यामध्ये फक्त मोठमोठ्या कंपन्याच नाहीतर जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझीपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या नावाचाही समावेश आहे. आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) ‘चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड’ नावाची कंपनी चालवते, ज्याची पॅरेंट ऑर्गनायझेशन इंडिया सीमेंट आहे. 

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि देश-विदेशातील कोट्यवधी चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असणारा महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. धोनीच्या संघाची मालकी असलेल्या कंपनीनं तामिळनाडूच्या ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम’ म्हणजेच AIADMK ला निवडणूक रोख्यांद्वारे म्हणजेच, इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमांतून पैसे दिले आहेत. द हिंदूच्या वृत्तानुसार, एआयएडीएमकेला इलेक्टोरल बाँड्सद्वारे 6.05 कोटी रुपये मिळाले आहेत. यातील बहुतेक पैसे चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेड (इंडिया सिमेंट लिमिटेडचे ​​संचालक) कडून आले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जनं AIADMK ला किती पैसे दिलेत?

‘चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड’नं दोन दिवसांत AIADMK ला 5 कोटी रुपयांचा निधी दिला. हे पैसे 2019 मध्ये 2 ते 4 एप्रिल दरम्यान देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जकडून पक्षाला एकही पैसा मिळालेला नाही. निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च विभागाच्या सचिवांशी शेअर केलेल्या माहितीनुसार, पक्षाला कोईम्बतूरस्थित लक्ष्मी मशीन वर्क्स लिमिटेडकडून एक कोटी रुपये आणि चेन्नईस्थित गोपाल श्रीनिवासन यांच्याकडून 5 लाख रुपये राजकीय देणगी म्हणून मिळाले आहेत.

योगायोगानं, पक्षानं 2019 मध्ये दोनदा हीच माहिती दिली होती, एकदा तत्कालीन समन्वयक ओ. पन्नीरसेल्वम (हकालपट्टी केल्यानंतर) आणि त्यानंतर 2023 मध्ये त्याचे सरचिटणीस इडाप्पाडी के. पलानीस्वामी यांच्यामार्फतही दिला होता.

डीएमकेला किती पैसे मिळाले? 

तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रमुकबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डीएमकेला इलेक्टोरल बाँड्सद्वारे 656.6 कोटी रुपये मिळाले आहेत. डीएमकेने म्हटले आहे की निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळालेल्या 656.6 कोटींपैकी 509 कोटी रुपये फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेसच्या माध्यमातून मिळाले आहेत. DMK ला मिळालेल्या एकूण राजकीय देणग्यांपैकी फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेसच्या देणग्यांचा वाटा 77 टक्क्यांहून अधिक आहे. या कंपनीचा मालक सँटियागो मार्टिन याचीही अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशी सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

यालाच म्हणतात, “इट का जबाब पथ्थर से”; पुन्हा एकदा टाईम आऊटचा विवाद, श्रीलंकेनं डिवचलं, बांगलादेशनं सडेतोड उत्तर दिलं

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts