Uddhav Thackeray ended the Shiv Sena Santosh Bangar criticizes Uddhav Thackeray over Hingoli tour marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Santosh Bangar On Uddhav Thackeray : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जाहीर होताच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हिंगोली (Hingoli) जिल्ह्याचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर देखील टीका केली. दरम्यान त्यांच्या याच टीकेला आता बांगर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला असल्याचे म्हणत बांगर यांनी हल्लाबोल केला. तसेच, याचवेळी त्यानी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील खोचक शब्दात टीका केली. 

पोलिसांच्या धाडी पडल्यावर संतोष बांगर माझ्याकडे यायचा असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावर बोलतांना बांगर म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात सोपवली होती, मात्र, तीच शिवसेना संपवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. त्यांच्या पक्षात असतांना संतोष बांगर सारखा ढाण्या वाघ पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणायचे. सर्व जिल्हाप्रमुखांमध्ये नंबर एकचा कोणी जिल्हाप्रमुख असेल तर हिंगोलीचा संतोष बांगर असल्याचे म्हणायचे. दंगल झाल्यावर अन्याय होऊ नयेत म्हणून संतोष बांगर जायचा आणि त्याला मातोश्रीवर बोलावून प्रशंसा केली जायची. काळ मिम मुंबईत असतांना एक म्हतारी मिळाली आणि शिंदेंच्या शिवसेनेत असल्याचे महित झाल्याने तिने माझी पाठ थोपटली. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला. यामुळे अक्षरशः वेदना होतात,” असे बांगर म्हणाले. 

सभेला सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या…

पुढे बोलतांना बांगर म्हणाले की, “आम्ही काम करून जमीन भुसभुशीत केली, पण काळाच्या सभा पाहता काय परिस्थिती झाली. 2019 मध्ये मला उमेदवारी मिळाली त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या सभेला किती जनसमुदाय होता. पण, कालच्या सभेला काय परिस्थिती होती, सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यासाठी सक्षम नेतृत्व लागते आणि माणूस देखील तसा लागतो. मात्र, उद्धव ठाकरेंनी जे काही चेलेचपाटे जमा केले ते सर्व खंडण्या बहाद्दूर असल्याच” बांगर म्हणाले. 

संजय राऊत यांच्यावर सुद्धा टीका 

दरम्यान, याचवेळी बांगर यांनी संजय राऊत यांच्यावर सुद्धा टीका केली. “माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान असे म्हणत बांगर यांनी टीका केली. संजय राऊत यांनी पक्षाची राखरांगोळी करून टाकली आहे. आपण या मूर्ख लोकांसोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांना हे समजत कसे नाही. याच मूर्ख लोकांच्या नादी लागून ठाकरेंनी पक्षाचा सत्यानाश करून टाकला. संजय राऊत आणि अंबादास दानवे लाळचाटे लोकं आहेत. या लोकांच्या नादी लागू नयेत, कारण अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंनी सरळसरळ भाजपच्या सोबत यायला पाहिजे” असेही बांगर म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

भारतीय जनता पार्टी म्हणजे खंडणी गोळा करणारी टोळी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts