suraj chavan slams vijay shivtare purander sunetra ajit pawar vs supriya sule baramati lok sabha election maharashtra politics marathi update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: अजितदादांना आव्हान देणाऱ्या विजय शिवतारेंना (Vijay Shivtare) गेल्यावेळी आम्ही सांगून पाडलं होतं, यावेळी त्यांचं डिपॉजिट जप्त करू असं थेट आव्हान राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (NCP Suraj Chavan) यांनी दिलं आहे. माझा आवाका काय, माझी लायकी काय हे अजित पवारांना सांगतो असं म्हणत शिवतारेंनी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना सूरज चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं. 

विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना सूरज चव्हाण म्हणाले की, विजय शिवथारे हे महायुतीच्या घटक पक्षातील आहेत. कोणीही निवडणुक लढवू शकतो. मागच्यावेळी आम्ही सांगून त्यांचा पराभव केला होता, यावेळी सांगून त्यांचे डिपॅाझीट जप्त करू. त्यांच्या किडनीवर नाही तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आम्हालाही पाहायचे आहे की शिवतारेंचा आवाका काय आहे?

चार जागांचं पिल्लू रोहित पवारांनी सोडलंय

अनेक लोक दादांना भेटण्यासाठी आले आहेत. ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहोत, त्यांची रणनिती तयार करत आहोत. आम्हाला ज्या जागा मिळतील त्या जांगावर आमचा स्ट्राईक रेट 100 टक्के असेल. अजित पवारांना चार जागा मिळणार या अफवांचे जनक रोहित पवार आहेत, त्यांनीच हे पिल्लू सोडलंय. महायुतीमध्ये आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील.  

रोहित पवार हे स्वता भाजपमध्ये जायला तयार होते. मतदारसंघाच्या आणि देशाच्या हितासाठी आपण भाजप सोबत जावे असे त्यांनी त्यावेळी सांगिल्याचा दावा सूरज चव्हाणांनी केला. सुप्रियाताई मनसे हा सुपारीबाहद्दर पक्ष आहे असे म्हणत होत्या, मग आज त्यांना महाविकास आघाडीत बोलवताना कोणती सुपारी देत आहात असा सवालही त्यांनी विचारला. 

विजय शिवतारेंचे अजित पवारांना आव्हान

शिवसेना शिदे गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांना आव्हान देत बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याने अजित पवारांना ते अडचणीचं जाणार असल्याचं बोललं जातंय. 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts