Dhairyasheel Mohite Patil started election campaign vs ranjit naik nimbalkar Madha Lok Sabha Election bjp ncp maharashtra politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोलापूर : माढा लोकसभेच्या उमेदवारीबाबत  (Madha Lok Sabha Election)  तिढा कायम असताना धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आता प्रचारासाठी अजून दोन सदस्य बाहेर काढल्याचं  दिसतंय. त्यामुळे मोहिते पाटील आता माघारीच्या मनस्थितीत नसल्याचे वातावरण बनू लागले आहे. भाजपकडून उमेदवारी मागितलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या निर्णयाची वाट न पाहता आपला प्रचार सुरू केला आहे.

धैर्यशील मोहिते पाटलांनी करमाळ्यातून आपल्या प्रचाराला सुरूवात केल्यानंतर आता त्यांच्या परिवारातील आणखी दोन व्यक्ती प्रचारासाठी बाहेर पडले आहेत. बुधवारी धैर्यशील मोहिते पाटील सांगोला तालुक्यात दौरा करणार आहेत. गेल्या वेळच्या निवडणुकीवेळी सांगोला हा निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. कायम दुष्काळी असणाऱ्या सांगोल्यात पाण्याच्या मोठ्या योजना आणल्याने निंबाळकर याना येथे चांगले वातावरण आहे. 

आज सांगोल्यात प्रचार

शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमदार शहाजीबापू पाटील हे निंबाळकरांच्या बाजूने जोरदार प्रचार करत आहेत. आता धैर्यशील मोहिते पाटील सांगोल्यात येत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दौऱ्याची सुरुवात सांगोला शहरापासून होणार असून वासूद, जवळा, घेरडी, पार, डिकसळ, हांगिरगे, वाणी चिंचाळे, वाकी, आलेगाव, मेडशिंगी, वाढेगाव या गावांचा दौरा करून रात्री पुन्हा सांगोला शहरात परतणार आहेत.

मोहिते पाटील परिवार प्रचारात 

गुरुवारी धैर्यशील यांच्या पत्नी शितलादेवी मोहिते पाटील या करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कोंढार चिंचोली, कात्रज, टाकळी, कुंभारगाव, सावेडी, दिवेगव्हाण, राजुरी पोन्धवडी, विहाळ  आणि कोर्टी या गावातील विविध मंदिरात जाणार असून येथे त्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
 
धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू शिवतेजसिंह मोहिते पाटील हे गुरुवारी माढा तालुक्यातील वाकावं, माढा, उंदरगाव, कापसेवाडी, मानेगाव, धानोरे आणि कुर्डुवाडी या गावांचा दौरा करणार आहेत. 

शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

एकाबाजूला मोहिते पाटील यांनी प्रचाराचा धडाका सुरु केला असताना आता आघाडीतून शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. मोहिते पाटील जर तुतारी घेऊन निवडणूक लढविण्यास तयार असतील तर उमेदवाराच्या शोधात असणाऱ्या शरद पवार हे हि संधी सोडणार नाहीत. आता निर्णय मोहिते पाटील यांना करायचा असून भाजपकडून उमेदवारीच्या बदल होणार नसेल तर मोहिते पाटील यांना भाजप सोडून पुन्हा पवार यांच्याकडे परतावे लागणार आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts