ABP Majha Headlines 6.30 AM 20 March 2024 Maharashtra News Lok Sabha Election 2024 Amit Shah Raj Thackeray Meet Mahayuti Deepak Kesarkar Zero Hour Uddhav Thackeray On Raj Thackeray Maharashtra Politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 6.30 AM : 20 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अमित शाहांसोबतच्या भेटीत राज ठाकरेंकडून मुंबईतल्या दोन जागांची मागणी, शाहांकडून मात्र एकाच जागेची ऑफर
अमित शाह आणि राज ठाकरेंमध्ये सकारात्मक चर्चा, बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया, तर राज ठाकरे सांगतील त्या जागेवरुन लोकसभा लढणार, नांदगावकरांचं वक्तव्य
महायुतीत दाखल झाल्यास मनसेनं इंजिन चिन्हावर न लढता तीन पक्षांपैकी एका पक्षाच्या चिन्हावर लढावं, झीरो अवर कार्यक्रमात दीपक केसरकरांचं वक्तव्य
महाराष्ट्रात ठाकरे नावाशिवाय मतं मिळत नाहीत, आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न, राज ठाकरे आणि शाहांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका
उद्धव ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर, दुपारी जिजाऊ जन्मस्थळाला भेट देऊन जनसंवाद मेळावा घेणार.
महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी २१ मार्चला जाहीर होणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती, सांगली, भिवंडी काँग्रेसचं लढणार, पटोलेंचा निर्धार.
सांगलीची जागा १०० टक्के ठाकरे गटाचीच, संजय राऊतांचा दावा, ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नेते आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची शक्यता
ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती, तर अश्विनी भिडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक
लोकसभा निवडणुकांमुळे UPSCची प्रीलिम्स परीक्षा पुढे ढकलली, २६ मे ऐवजी १६ जूनला परीक्षा घेणार

[ad_2]

Related posts