IPL 2024 New Rules introduces two bouncers an over and smart replay system for quicker more accurate reviews Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2024 New Rules: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 सीझन 22 मार्चपासून सुरू होणार आहे. यंदा आयपीएलचा महासंग्राह भारतातच खेळवला जाणार आहे. यंदा आयपीएलमध्ये खेळाडूंना दोन नव्या नियमांचा सामना करावा लागणार आहे. ज्यामुळे पंच आणि गोलंदाजांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच रोमांचक सामनेही चाहत्यांना पाहता येणार आहेत. यावेळी आयपीएलमधील सलामीचा सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होणार आहे. आरसीबी आता नवीन नाव आणि नवीन जर्सीसह आयपीएलमध्ये प्रवेश करणार आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आहे.

IPL 2024 मध्ये गोलंदाजांसाठी बाउंसर आणि पंचांसाठी स्मार्ट रिव्ह्यू सिस्टमचे नियम लागू केले जातील. म्हणजेच, यावेळी गोलंदाज आणि पंच दोघांचीही मोठी मदत मिळणार आहे. सविस्तर जाणून घेऊयात नव्या दोन नियमांबद्दल…

1. आता एका ओव्हरमध्ये बॉलर्सना फक्त 2 बाऊन्सर अलाउड 

आता आयपीएलमध्ये बॉलर्सना एका ओव्हरमध्ये फक्त दोन बाऊन्सर टाकण्याची मुभा असेल. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये एकच बाऊन्सर टाकण्याचा नियम आहे. पण यावेळी आयपीएलमध्ये बदल करण्यात आले आहेत. याआधी हा नियम भारतीय देशांतर्गत टी-20 स्पर्धेत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वापरला गेलेला. या नियमामुळे सामन्याची उत्कंठाही वाढणार आहे.

2. आता आयपीएलमध्ये स्मार्ट रिव्ह्यू सिस्टीम 

यावेळी आयपीएलमधील सर्वाधिक चर्चेत असलेला नियम स्मार्ट रिव्ह्यू सिस्टम लागू करण्यात येणार आहे. या नियमामुळे अम्पायर्सना आपला निर्णय देताना मदत मिळणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, आतापासून टीव्ही अम्पायर्स आणि हॉक-आय ऑपरेटर एकाच खोलीत बसतील. यामुळे टीव्ही अम्पायर्सना निर्णय देण्यात खूप मदत होईल. दरम्यान, आतापर्यंत टीव्ही अंपायर आणि हॉक-आय यांच्यामध्ये टीव्ही प्रसारण दिग्दर्शक खूप महत्त्वाचा होता. ब्रॉडकास्ट डायरेक्टर निर्णय देण्यासाठी हॉक-आयपासून टीव्ही अंपायरला सर्व फुटेज द्यायचा. पण आता टीव्ही ब्रॉडकास्ट डायरेक्टरची भूमिका संपणार आहे. 

टीव्ही अम्पायर्स आणि हॉक-आय ऑपरेटर एकाच खोलीत बसणार 

आतापासून टीव्ही अम्पायर्स आणि हॉक-आय ऑपरेटर एकाच खोलीत बसतील. अशाप्रकारे, स्मार्ट रिप्ले प्रणाली अंतर्गत, टीव्ही अंम्पायर्सना आता थेट हॉक-आय ऑपरेटरकडून माहिती मिळणार आहे. अम्पायर्सना हॉक-आयच्या आठ हायस्पीड कॅमेऱ्यांमधून काढलेले फोटो मिळतील, ज्यामुळे निर्णय देणं सोपं होईल. तसेच, नवीन नियमांनुसार, टीव्ही अम्पायर्सना अधिक फुटेज पाहण्याची सुविधा असेल, परंतु यापूर्वी हे शक्य नव्हते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

RCB च्या नावात झळकणार कर्नाटकाची अस्मिता; आरसीबीनं नावात केला बदल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts