Chhatrapati Sambhaji Nagar Crime News 14 Year Old Girl Was Rape 50 Times Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात एका 14 वर्षांच्या मुलीवर 6 जणांनी अत्याचार (Gangrape) केल्याची घटना पाच दिवसांपूर्वी समोर आली होती. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरु होता, ज्यात या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 40 ते 50 वेळा अत्याचार करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान तिने ही माहिती दिली आहे. 

छत्रपती संभाजीनगर शहरातील एका 15 वर्षांच्या मुलीचा अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करत तिच्यावर 6 जणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचं प्रकार पाच दिवसांपूर्वी समोर आला होता. दरम्यान पोलिसांनी एकूण सहा जणांविरोधात विधिसंघर्षग्रस्त बालकावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक तसेच आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, याच वैद्यकीय तपासणीदरम्यान पीडित मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची आपबिती सांगितली. रात्री-अपरात्री नराधमांनी मला धमकावून घराबाहेर बोलावले. निर्मनुष्य ठिकाणी नेत 40  ते 50  वेळा अत्याचार केला, अशी धक्कादायक माहिती या 14 वर्षीय पीडितेने दिली. त्यानंतर अत्याचारात वापरलेली कार सातारा पोलिसांनी जप्त केली आहे.

अल्पवयीन आरोपींची बालगृहात रवानगी

पीडित मुलीवर सहा जणांनी ऑक्टोबर 2022 ते मे 2023 दरम्यान अत्याचार केला. सुरुवातीला विश्वासू मित्राने अत्याचार करून त्याचे मोबाईलमध्ये चित्रण केले. ते व्हायरल करण्याची धमकी देत नात्यातील एका तरुणासह अन्य मित्रांना या क्रूर कृत्यात सहभागी करून घेतले. त्यानंतर पीडित मुलीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सतत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यामुळे नेहमीच्या त्रासाला कंटाळून तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सातारा पोलिसांनी अक्षय चव्हाण, शेख लतीफ ऊर्फ असीम पठाण आणि रामेश्वर गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तर अल्पवयीन आरोपींची बालगृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच शासकीय बालगृहात असलेल्या पीडितेचा पोलीस जबाब नोंदवत आहेत. पोलीस आता तांत्रिक पुरावे गोळा करत आहेत. तिने सांगितलेल्या सर्व ठिकाणांवर पोलिसांनी पाहणी देखील केली. या गुन्ह्यात अक्षय त्याची कार वापरत असल्याने कार देखील जप्त करण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : संभाजीनगर हादरलं! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन मुलीवर 6 जणांचा अत्याचार

[ad_2]

Related posts