IPL 2024- Virat Kohli: Don’t Call Me King, Embarrassed Virat Kohli’s Plea to RCB Fans

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

आयपीएलच्या सतराव्या हंगामाची (IPL 2024) तयारी अंतिम टप्प्यात आली असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. 22 मार्चला आयपीएलच्या नव्या हंगामातील पहिली लढत होणार आहे. या सामन्यासाठीची तिकीट विक्री ऑनलाइन होणार आहे. गेल्या वर्षी विजेते चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात पहिली लढत होणार आहे. याचपार्श्वभूमीवर भारतीय संघाचा आणि  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहली देखील संघाच्या ताफ्यात दाखल झाला आहे. 

गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परतणार आहे. मंगळवारी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी मैदानावर आरसीबीचा एक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिला प्रीमिअर लीग जिंकलेल्या आरसीबीच्या महिला संघाचा सत्कार करण्यात आला. यावेळी विराट कोहलीने आरसीबीच्या चाहत्यांना एक महत्वाचे आवाहन केले. 

आजच आम्हाला चेन्नईसाठी रवाना व्हायचं आहे. आमचं चार्टर्ड विमान उभं आहे, त्यामुळे आमच्याकडे पुरेसा वेळ नाही. मी आरसीबीसाठी, संघाच्या चाहत्यांसाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी नेहमी आरसीबीसोबत राहील आणि आयपीएलची ट्रॉफी जिंकणं, काय असतं, हे जाणून घेणं हेही माझं स्वप्न आहे. या वर्षी आम्ही ते करू अशी आशा आहे, असं भावूक विधान विराट कोहलीनं यावेळी केलं.

मला किंग बोलणं सोडा-

मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो की, सर्वप्रथम मला किंग बोलणं सोडा. कृपया मला विराटच बोला. मी आता फॅफ ड्यू प्लेसिसला हेच सांगत होतो की जेव्हा तुम्ही मला किंग बोलावता तेव्हा लाजल्यासारखं वाटतं. त्यामुळे मला विराट म्हणून हाक मारा, आजपासून मला किंग बोलणं सोडा,”असे विराट कोहली म्हणाला.

 

आरसीबीची संभाव्य प्लेईंग 11 

विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल/आकाश दीप आणि अल्जारी जोसेफ.

चेन्नई सुपर किंग्सची आरसीबीविरोधातील संभाव्य प्लेईंग 11 – 

ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे/समीर रिजवी, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, महीश तीक्षणा आणि मुस्ताफिजुर रहमान.   

नवज्योतसिंह सिद्धू पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार

नवज्योतसिंह सिद्धू पुन्हा एकदा क्रिकटच्या मैदानावर परतणार आहे. आगामी आयपीएल (IPL 2024) स्पर्धेत नवज्योतसिंह सिद्धू समालोचकाची भूमिका निभावणार आहे. स्टार स्पोर्ट्सने फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. नवज्योतसिंह सिद्धू यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. नुकतेच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर आता नवज्योतसिंह सिद्धू क्रिकेटच्या मैदानात परतणार आहेत. नवज्योतसिंह सिद्धू यांच्या या निर्णयामुळे आगामी काळात ते राजकारणात सक्रीय राहणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  

संबंधित बातमी : 

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts