[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
बोर्डातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर रोहितने १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून स्वत:हून माघार घेतली नाही तर तोच संघाचे नेतृत्व करेल. जर रोहितने या दोन कसोटी मालिकेत मोठी धावसंख्या केली नाही तर बीसीसीसीआय आणि राष्ट्रीय निवड समितीला कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो.
बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, या गोष्टीत कोणतेही सत्यता नाही की रोहीतला कर्णधारपदावरून हटवले जाील. तो दोन वर्ष (WTCचा तिसरा हंगाम) कर्णधार असेल. हा हंगाम २०२५ साली संपणार आहे. तेव्हा रोहितचे वय ३८ असेल. मला वाटते की शिव सुंदर दास आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दोन कसोटीनंतर रोहितची फलंदाजीचा फॉर्म पाहून निर्णय घ्यावा लागले.
कर्णधारपद नको होते…
भारतीय क्रिकेट बद्दल माहिती असलेल्या व्यक्तीने सांगितले की, विराट कोहलीने जेव्हा दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेनंतर कसोटीचे कर्णधारपद सोडले तेव्हा सुरुवातीला रोहितची कसोटीचे कर्णधारपद स्विकारण्याची तयारी नव्हती. कारण त्याला माहिती होते की त्याचे शरीर साथ देणार नाही. तेव्हा सौरव गांगुली आणि जय शहा यांनी केएल राहुलला कर्णधार म्हणून निवडले होते. पण आफ्रिकेत कर्णधार म्हणून तो प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे रोहितला कसोटीच्या कर्णधारपदासाठी राजी करावे लागले. विराटने कर्णधारपद सोडण्याचा हट्ट केला होतो.
रोहितने नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२० धावांची खेळी केली होती. त्यानंतर रोहितला कसोटीत प्रभाव टाकता आला नाही. रोहितने २०२२ साला कर्णधारपद हाती घेतल्यानंतर भारताने १० मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी ३ मध्ये तो नव्हता. सात कसोटी त्याने ३९० धावा केल्या आहेत. एक शतक वगळता रोहितने एकदाही ५० पेक्षा अधिक धावा केल्या नाहीत. याच काळात विराटने सर्व १० कसोटी खेळल्या आहेत आणि त्यातील १७ डावात ५१७ धावा केल्या आहेत. पुजारने या काळात ८ कसोटीच्या १४ डावात ४८२ धावा केल्या आहेत.
[ad_2]