ipl 2024 hardik pandya once mumbai indians realesed in 2021 retain as captin can reclaim trophy after three years

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : आयपीएलचं (IPL 2024) 17 वं पर्व येत्या दोन दिवसांमध्ये सुरु होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) या दोन्ही संघांनी पाच वेळा विजेतेपद पटकावलं आहे. मुंबई इंडियन्सला गेल्या तीन सीझनमध्ये विजेतेपद पटकावता आलेलं नाही. मुंबई इंडियन्सनं गेल्या तीन वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी आता कॅप्टन बदलला आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) नेतृत्वाची संधी मुंबईच्या मॅनेजमेंटकडून देण्यात आली आहे. एकेकाळी मुंबईच्या संघानं हार्दिक पांड्याला संघातून रिलीझ केलं होतं. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटवर त्याच हार्दिकला संघात घेण्याची वेळ का आली. गेल्या तीन वर्षात नेमकं काय घडलं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

मुंबईनं हार्दिकला संघातून मुक्त का केलं?

मुंबई इंडियन्सनं 2020 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावलं होतं. मात्र, हार्दिक पांड्याची कामगिरी लक्षात घेता मुंबईनं त्याला 2021 च्या खेळाडूंच्या लिलावापूर्वी संघातून मुक्त केलं होतं.2021, 2022 आणि 2023 च्या आयपीएलमध्ये मुंबईची कामगिरी देखील त्यांच्या लौकिकाला साजेशी झाली नाही. 2021 ला मुंबईची टीम पाचव्या स्थानी राहिली. 2022 च्या आयपीएलमध्ये मुंबईची टीम गुणतालिकेत तळाला होती. यानंतर 2023 मुंबईनं कमबॅक केलं मात्र 2023 च्या आयपीएलमध्ये मुंबईला हार्दिक पांड्याच्याच गुजरात टायटन्स कडून क्वालिफायर २ मध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.

हार्दिक पांड्यानं मुंबईची टीम सोडल्यानंतर काय केलं?

हार्दिक पांड्यानं मुंबईच्या टीममधून बाहेर पडल्यानंतर 2022 मध्ये नव्यानं आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सच्या टीमचं नेतृत्व स्वीकारलं. गुजरात टायटन्सच्या टीमची बांधणी केली. आयपीएलच्या 2022 पर्वात हार्दिक पांड्यानं इतिहास रचला. हार्दिकच्या नेतृत्त्वात पहिलंच आयपीएल खेळणाऱ्या गुजरात टायटन्सनं विजेतेपद मिळवलं. दुसरीकडे त्याच पर्वात मुंबईची टीम मात्र गुणतालिकेत सर्वात शेवटी होती. 2023 च्या आयपीएलमध्ये गुजरातच्या टीमनं अंतिम फेरीत धडक दिली होती. क्वालिफायर 2 च्या मॅचमध्ये गुजरातनं मुंबईचा पराभव केला मात्र त्यांना अंतिम फेरीत विजय मिळवण्यात अपयश आलं. 

हार्दिकला मुंबईचं नेतृत्त्व काय आहेत आव्हानं?

रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचं नेतृत्व स्वीकारणाऱ्या हार्दिक पांड्यापुढं आव्हानं देखील आहेत. सूर्यकुमार यादव सारखा स्फोटक फलंदाज अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. दुसरीकडे जेसन बेहरेनड्रॉफ हा देखील आयपीएल बाहेर गेला आहे त्याच्या जागी गेराल्ड कोझीला संघात घेण्यात आलं आहे. मात्र, तो देखील दुखापतीतून सावरत आहे. रोहित शर्मावर आता नेतृत्त्वाची जबाबदारी नसल्यानं तो दबावातून मुक्त होऊन आक्रमक फलंदाजी करतो का हे पाहावं लागेल.  

संबंधित बातम्या :

MS Dhoni: गुड न्यूज, धोनी यंदाचं आयपीएल गाजवणार, सराव सत्रात हेलिकॉप्टर शॉट मारत दिले संकेत, व्हिडिओ समोर

IPL 2024 : धोनी, रोहित अन् विराटसह पाच जण खेळलेत प्रत्येक आयपीएल हंगाम

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts