Lucknow Super Giants Fast bowler David Willey has withdrawn from IPL 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Latest Marathi News: IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) 22 मार्चपासून सुरू होत आहे. पण याआधी केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने आयपीएलमधून माघार घेतली आहे.

इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विली अलीकडेच पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) खेळल्यानंतर भारतात दाखल झाला होता. यंदा डेव्हिड विली लखनऊच्या संघाकडून आयपीएल खेळणार होता. मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे डेव्हिड विलीने ब्रेक घेण्याचे ठरवले आणि तो इंग्लंडला परतला. परंतु आयपीएलच्या मधल्या काळात डेव्हिड विली पुनरागमन करेल, अशी माहिती लखनऊ संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी दिली आहे.  

लखनऊने 2 कोटींची बोली लावत घेतले होते ताफ्यात-

डेव्हिड विली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)कडून मागील दोन आयपीएल हंगाम खेळला. यानंतर लखनऊ संघाने लिलावात 2 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले. डेव्हिड विली गेल्या दोन महिन्यांपासून सतत प्रवास करत असल्याचे लँगरने सांगितले. या कारणास्तव त्यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. विली नुकतेच मुलतान सुल्तान्ससाठी पीएसएल आणि अबू धाबी नाइट रायडर्सकडून आयएलटी 20 मध्ये खेळला आहे. पीएसएलचा अंतिम सामना 18 मार्चलाच झाला होता. इस्लामाबाद युनायटेडने मुलतान सुलतान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या सामन्यात विलीने 6 धावा केल्या होत्या आणि एक विकेट घेतली होती. 

मार्क वूडचीही माघार-

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाला आधीच मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडही आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याला जूनमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक खेळायचा आहे. अशा परिस्थितीत वुडने आपल्या इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या विनंतीवरून वर्कलोडमुळे आयपीएलमधून आपले नाव माघारी घेतले. त्याच्या जागी जोसेफचा संघात समावेश करण्यात आला आहे. संघात वूड आणि विलीसारखे गोलंदाज नसल्यामुळे संघात अनुभवाची कमतरता भासणार असल्याचे लँगर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पण गेल्या काही दिवसांत मला माझ्या टीममध्ये खूप टॅलेंट दिसले. यापूर्वी दुखापत झालेले काही खेळाडू आता पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची माहिती देखील लँगर यांनी दिली.

संबंधित बातम्या:

Hardik Pandya: Mumbai Indians: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सला जेतेपद पटकावून देणार?; जाणून घ्या, संघाची जमेची बाजू!

Hardik Pandya:मुंबईनं पुन्हा हार्दिक पांड्यावर विश्वास का दाखवला? तीन वर्षात नेमंक काय घडलं?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts