Zero hour Harshwardhan Patil vs Ajit Pawar Crisis in Mahayuti maharashtra news abp majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Zero Hour : महायुतीमध्ये अजित पवारांवरून महाभारत ? बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर विधानसभा मतदारसंघालाही तितकंच महत्वं आहे.. इथं भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचा प्रभाव आहे.. ते जेव्हा काँग्रेसमध्ये होते.. तेव्हापासून इथं हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार हा राजकीय संघर्ष आहे.. आज दोघेही महायुतीचा भाग झालेत.. तरीही तोच संघर्ष कायम आहे.. कारण, लोकसभा निवडणुका जाहीर होताच.. हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटलांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली.. 
त्याला कारण होत्या विधानसभेच्या निवडणुका.. हर्षवर्धन पाटलांच्या मते, मागील तीन लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही इंदापूरमधून सुप्रिया सुळेंना मदत केली.. मात्र, विधानसभेत आमची फसवणूक झाली.. त्यामुळे आता ‘आधी विधानसभेचा शब्द द्या, नंतर लोकसभेचे पाहू,’ असं म्हणत हर्षवर्धन पाटीलही आक्रमक झालेत.. ज्या इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील चारवेळा आमदार होते.. त्याच इंदापूरमध्ये अजित पवारांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला.. दोन हजार चौदापासून दत्तात्रय भरणेच इंदापूरचे आमदार आहेत.. विधानसभेतील हीच नाराजी आज हर्षवर्धन पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर मांडली.. त्याचं झालं असं की बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली… त्यात भाजपच्या अनेक नेत्यांना बोलावलं होतं.. याच बैठकीत, हर्षवर्धन पाटलांनाही बोलवलं.. त्यावेळी त्यांच्या कन्या अंकिता पाटीलही त्यांच्यासोबत होत्या.. आणि त्याच बैठकीत काय काय़ घडलं.. त्यावर फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली.. हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण खुद्द हर्षवर्धन पाटलांशीही चर्चा करणार आहोत.. काही मिनिटांमध्येच ते आपल्या गेस्ट सेंटरला असतील.. मात्र, आजच्या बैठकीनंतर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली.. ती पाहुयात..

[ad_2]

Related posts