IPL vs PSL : जीवाचं रान करुन भारताशी स्पर्धा, पाकिस्तानच्या PSL मध्ये विजेत्यांना किती रक्कम? स्मृतीच्या RCB च्या जवळपासही नाही!

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
IPL vs PSL : भारतात 2008 मध्ये आयपीएल रनसंग्रामाला सुरुवात झाली. आयपीएलमध्ये जगातील दिग्गज खेळाडू सहभागी होतात, यामधून युवा खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळतं. आयपीएलनं भारतीय क्रिकेटलाही अनेक स्टार खेळाडू दिले. सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अर्शदीप सिंह, शिवम दुबे यांच्यासह अनेक स्टार खेळाडू भारताला दिले. इतकेच काय विदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये नावाजले. भारतामधील आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्ताननेही पीएसएल (पाकिस्तान सुपर लीग) स्पर्धा सुरु केली. 2015 मध्ये पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरु झाली. तेव्हापासून आयपीएल आणि पीएसएल याची तुलना होऊ लागली. जीवाचं रान करुन भारताशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येतो, पण त्यामध्ये नेहमीच अपयश येतं. दोन्ही स्पर्धेच्या बक्षिसाच्या रक्कमेची तुलानाही होते, पण आयपीएलची रक्कम जास्तच असल्याचं नेहमीच दिसतं. इतकेच काय भारतात नुकत्याच झालेल्या महिला प्रिमियम लीग स्पर्धेतील विजेत्यालाही पीएसएलच्या विजेत्यापेक्षा जास्त रक्कम मिळते.

पीएसएलला आयपीएलपेक्षा चांगलं कसं आहे, हे चित्रित करण्याकडे पाकिस्तानचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामध्ये त्यांना कधीच यश येत नाही. सोमवारी पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेचा अंतिम सामना झाला. तेव्हापासून या लीगची बक्षीस रक्कम हा चर्चेचा विषय राहिला आहे. शादाब खानच्या इस्लामाबाद युनायटेड संघाने मोहम्मद रिझवानच्या मुलतान सुलतान संघाचा पराभव करत चषकावर नाव कोरलं. जेतेपदाच्या लढतीत इस्लामाबादनं शेवटच्या चेंडूवर मुलतानचा तीन गडी राखून पराभव केला. इस्लामाबादनं सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर 160 धावांचं आव्हान पार केले. शादाब खानच्या संघाला जेतेपदासाठी जी रक्कम मिळाली ती महिला चषक जिंकल्यानंतर स्मृतीच्या आरसीबीला मिळालेल्या रक्कमेपक्षा कमीच आहे. याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

पीएसएल विजेत्याला किती मिळाले ?

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला 4.13 कोटी रुपये मिळतात. तर उपविजेत्या संघाला 1.65 कोटी रुपये मिळतात. शादाब खानच्या इस्लामाबाद युनायटेडला पीएसएल 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर  4.13 कोटी रुपये मिळाले. पीएसएल 2024 उपविजेत्या मुलतान सुलतान्सला सुमारे 1.65 कोटी मिळाले.

महिला प्रिमियर लीग विजेत्याला किती ?

स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील आरसीबीने यंदा चषकावर नाव कोरले. आरसीबी महिला संघाला WPL चॅम्पियन झाल्यानंतर 6 कोटी रुपये मिळाले. उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला सुमारे 3 कोटी रुपये मिळाले आहेत.

आयपीएल चषक विजेत्याला किती ?

आयपीएलच्या 17 व्या हंगामात विजेतेल्या संघाला किती रक्कम मिळणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती आयपीएलकडून आलेली नाही. पण गेल्यावर्षी विजेत्याला संघाला 20 कोटी रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या संघाला 12.5 कोटी देण्यात आले होते. गेल्यावर्षी चेन्नई सुपर किंग्सने जेतेपद मिळवलं होतं, तर गुजरात उपविजेता होतं.  यंदाच्या आयपीएल हंगामातही विजेत्याला 20 कोटींची रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

म्हणजेच आयपीएल अथवा WPL ची बक्षीस रक्कम पाकिस्तानच्या पीएसएलच्या बक्षीस रकमेपेक्षा जास्त आहे. आयपीएल जेतेपदाची रक्कम तर पीएसएलपेक्षा जवळपास पाचपट जास्त आहे. फक्त सोशल मीडियावर भारताशी तुलना करुन चालत नाही, हेच यावरुन दिसतेय.

[ad_2]

Related posts