Uddhav Thackeray In Sangli Lok Sabha Constituency Today Chandrahar Patil candidature will be announced Congress Shiv Sena marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sangli Lok Sabha Constituency : सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha) जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये (Congress) रस्सीखेच सुरु असतानाच, उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सांगली जिल्ह्यातील मिरजेत आज जनसंवाद सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या नावाची ठाकरे घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. विशेष म्हणजे याच मतदारसंघावर काँग्रेसकडून देखील दावा केला असून, विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर सांगली लोकसभेवरून सुरू असलेल्या राजकीय कलगीतुरा थांबवणार की, आणखी सस्पेन्स वाढणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.  

उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या जन संवाद सभेच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर येत आहेत. मिरजेत सायंकाळी 5 वाजता त्यांची सभा पार पडणार आहे. या मेळाव्यात सांगली लोकसभेची अधिकृत उमेदवारी ठाकरेंकडून चंद्रहार पाटील यांना जाहीर होणार का? याकडे लक्ष असणार आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील मागील 4 दिवसापासून मुंबईत ठाण मांडुन आहेत. काँग्रेसचे नेतेही सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडेच राहील यावर ठाम असून, काँगेसकडून उमेदवारी बाबतचा अंतिम निर्णय आज घेतला जाऊ शकतो. 

वसंतदादाच्या समाधीचे दर्शन घेणार…

दरम्यान, उद्धव ठाकरे आज सांगलीत आल्यानंतर प्रथम माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळी जाऊन वसंतदादाच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील काँग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक असतांना आणि या सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची वसंतदादाच्या समाधीस्थळाच्या भेटीला महत्व प्राप्त झालेय. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्याचा दौरा केला जात असून, ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या जनसंवाद सभा देखील होतांना पाहायला मिळत आहे. अशात आज उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्याचा दौरा करणार असून, मिरजेमध्ये जाहीर सभा देखील घेणार आहेत. यापूर्वी काही सभांमध्ये त्यात्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आजच्या सभेत ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर उद्धव ठाकरे शिक्कामोर्तब करणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chandrahar Patil on Vishal Patil : तर मी विशाल पाटलांमागे शिवसैनिक म्हणून उभा राहीन; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी चंद्रहार पाटील नेमकं काय म्हणाले?

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts