ramdas athawale on raj thackeray says not trust on MNS Chief Mahayuti Cm Eknath Shinde Shiv Sena BJP NCP Maharashtra Politics Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Politics : मुंबई : महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रह दिनाला आज रिप्लब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी हजेरी लावली होती. तत्पूर्वी त्यांनी महाड येथील विसावा हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक राजकीय गोष्टींचा उलघडा केला. यावेळी त्यांनी लोकसभा आणि मोदींच्या विकासकामांची चर्चा केली. महाराष्ट्रात आम्हाला दोन जागा पाहिजेत, शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा आम्हाला युतीतून मिळणं गरजेचं आहे, असंही ते यावेळी म्हणाले. 

रामदास आठवले म्हणाले की, “नरेंद्र मोदी यांनी महिलांना 33 टक्के आरक्षण देऊन बाबासाहेब आंबडेकर यांचं स्वप्न साकार केलं आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश विकासाकडे वाटचाल करतोय. देशातील नॅशनल हायवे सुसाट झालेत. नितीन गडकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची निर्मिती करत आहेत. 370 कलम हटवून जम्मू काश्मीरमध्ये मोदींच मोठं काम आहे. मोदी हे जगातील सर्वात मोठे नेते आहेत. विकासपुरुष म्हणून त्यांची आज ओळख आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्वामुळेच रिपब्लिकन पार्टी मोदींसोबत आहे.”  तसेच, “संविधान बदलणार ही निव्वळ अफवाच आहे. देशाचं संविधान कोणीच बदलू शकत नाही. येणाऱ्या निवडणुकीत मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. जनतेचा कौल पुन्हा मोदींच्या बाजूनंच असेल. महाराष्ट्रात आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत.” 

राज ठाकरे अमित शहांना भेटून योग्य निर्णयाकडे वळलेत, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत. तसेच, एकदिवस राहुल गांधींनासुद्धा एनडीएमध्ये यावं लागेल, असं म्हणत रामदास आठवलेंनी काँग्रेसला टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे महायुतीला आगामी निवडणुकीत हमखास 45 जागा मिळतील, असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. 

आम्हाला दोन जागा मिळाव्यात, राज ठाकरेंच्या निर्णयावर आम्हाला विश्वास नाही : रामदास आठवले 

महाराष्ट्रात शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा लोकसभेसाठी आम्हाला मिळणं गरजेचं आहे, अशी इच्छाही रामदास आठवलेंनी जाहीरपणे व्यक्त केली आहे. शिर्डीची जागा दिली नाही तर बदल्यात अन्य काही देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असंही ते म्हणाले. आम्ही कितीही झालं, तरी इंडिया आघाडीत जाणार नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार सत्तेत विकास करण्यासाठी राहणं पसंत करू, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. आरपीआय पक्ष  छोटा असला तरी महाराष्ट्रात 2 जागा आम्हाला मिळणं अपेक्षित आहे. राज ठाकरेंच्या निर्णयावर आम्हाला विश्वास नाही. आमच्या युतीत राज ठाकरे येणे अनपेक्षित, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे, असं म्हणत आठवलेंनी थेट उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.  

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts