South Africa’s legendary spinner Keshav Maharaj visited Ram Mandir in Ayodhya

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज फिरकीपटू केशव महाराजने आज अयोध्येतील राम मंदीरात जाऊन प्रभू श्रीरामलल्लाचे दर्शन घेतले. केशव महाराजने स्वत: दर्शनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या या फोटोवर भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भारतीय संस्कृतीशी मूळ असलेल्या केशव याने मंदिराचे उद्द्घाटन झाल्यानंतर तेथे जाऊन दर्शन घेण्याची इच्छा बोलून दाखवली होती.तसेच केशव महाराजने याआधीही भारतातील अनेक मंदिरांना भेट दिली आहे. केशव महाराज सध्या आयपीएलसाठी भारतात दाखल झाला आहे. केशव महाराज लखनौ संघाकडून खेळणार आहे. प्रभू श्रीरामलल्लाच्या दर्शनासाठी केशव महाराजसोबत संघाचा मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर, फिरकीपटू रवी बिश्नोई देखील उपस्थित होते. 


केशव महाराज भारतीय वंशाचा असून त्याचे पूर्वज भारत सोडून दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले. पण तरीही त्यांनी हिंदू संस्कृतीशी आपली नाळ जोडून ठेवली. केशव महाराज हा हनुमानाचा मोठा भक्त असून तो आजही भारतात आल्यावर अनेक मंदिरांना भेट देत असतो. गेल्यावर्षी भारतात झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये केशव महाराज दक्षिण आफ्रिकेच्या टीमचा भाग होता. यावेळी केशवने त्याच्या बॅटवर ऊँ असे लिहिले होते. तसेच भारताविरुद्ध खेळत असताना केशव महाराज मैदानावर दाखल होताच  “राम सिया राम” हे गाणं वाजताना पाहायला मिळतं.

केशव महाराजची कारकीर्द

केशव महाराजांच्या कारकीर्दवर नजर टाकल्यास 50 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त या खेळाडूने 44 एकदिवसीय आणि 27 टी-20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी सामन्यांमध्ये केशव महाराजने 31.99 च्या सरासरीने आणि 3.17 च्या इकॉनॉमीसह 158 विरोधी फलंदाजांना आपला बळी बनवले आहे. या फॉरमॅटमध्ये केशव महाराजची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे १२९ धावांत ९ बळी. याशिवाय त्याने 9 वेळा कसोटी सामन्यात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. तर त्याने 1 कसोटीत 10 विकेट्स घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या:

IPL 2024: आयपीएल 2024चे जेतेपद कोण पटकावणार?; CSKच्या चाहत्यांना न आवडणारी सुरेश रैनाची भविष्यवाणी!

IPL 2024: Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अर्जुन तेंडुलकरहून लहान असलेल्या गोलंदाजाची एन्ट्री; विश्वचषकात प्रतिस्पर्धी संघावर पडला होता भारी

आयपीएलमध्ये ५ सामन्यात २ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाची मोहम्मद शमीच्या जागी वर्णी; गुजरातची टायटन्सची घोषणा

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts