ipl 2024 ms dhoni handover chennai super kings captain post to ruturaj gaikwad

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

चेन्नई : ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्याकडे चेन्नईच्या नेतृत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. मराठमोळा ऋतुराज गायकवाड आता महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) जागी चेन्नईचं नेतृत्त्व करणार आहे. क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले (Sunandan Lele) यांनी एबीपी माझासोबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. आयपीएलमध्ये (IPL) पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचं नेतृत्त्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आली आहे. एबीपी माझानं विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सुनंदन लेले यांनी होय हे धोनीचं शेवटचं आयपीएल आहे असं म्हटलं. 

महेंद्रसिंह धोनीचं हे शेवटचं आयपीएल? 

क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी एबीपी माझासोबत बोलताना होय हे धोनीचं शेवटचं आयपीएल असल्याचं म्हटलं.महेंद्रसिंह धोनीनं आयीपएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पुणे सुपरजाएंट्स संघाचं प्रतिनिधीत्व केलेलं आहे. धोनीनं चेन्नईला पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलेलं आहे. आता 2024 च्या आयपीएलपूर्वी चेन्नईची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आल्यानं धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

महेंद्रसिंह धोनी ऐवजी ऋतुराज गायकवाडकडे चेन्नईचं नेतृत्त्व देण्याचा निर्णय हा धक्कादायक नसल्याचं मत देखील सुनंदन लेले यांनी मांडलं.ऋतुराज गायकवाड आणि धोनीचा स्वभाव सारखा आहे.चेन्नईच्या टीममध्ये ऋतुराजचं स्थान 100 टक्के पक्कं आहे त्यामुळं नेतृत्त्वाची धुरा मराठमोळ्या युवा खेळाडूकडे देण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाड याचे कुटुंबीय देखील दोन दिवसांपूर्वी चेन्नईत दाखल झाले असल्यानं हा राज्याभिषेक होणार अशी कुणकुण मला लागली होती, असंही सुनंदन लेले म्हणाले.

रवींद्र जडेजाऐवजी ऋतुराजला संधी का मिळाली?

सुनंदन लेले यांनी चेन्नईच्या टीममध्ये रवींद्र जडेजा असताना ऋतुराज गायकवाड याला का संधी मिळाली याचं देखील कारण सांगितलं आहे. 2022 च्या आयपीएलमध्ये नेतृत्त्व रवींद्र जडेजाकडे देताना चेन्नईच्या टीम मॅनेजमेंटमध्ये वरिष्ठ पातळीवर ऋतुराज गायकवाडच्या नावाचा देखील विचार झाला होता. मात्र, रवींद्र जडेजाची ज्येष्ठता आणि प्रामाणिकपणा याचा विचार करुन त्याच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता मात्र, ऋतुराज गायकवाड याचा आणि धोनीचा स्वभाव सारखा असणं, ऋतुराज कष्टकरी आणि मेहनती असल्यानं त्याला कॅप्टनपदाची संधी देण्यात आली,असं सुनंदन लेले म्हणाले. ऋतुराज गायकवाडनं आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप देखील मिळवली आहे. संघात त्याचं स्थान १०० टक्के पक्कं असल्यानं चेन्नईच्या नेतृत्त्वाची संधी त्याला मिळाली, असं  सुनंदन लेले म्हणाले.   

धोनीकडून नेतृत्त्व बदलाचे संकेत

महेंद्रसिंह धोनीनं काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट केली होती. धोनीच्या त्या पोस्टपासूनच चेन्नईचा कॅप्टन बदलला जाणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.धोनीनं नव्या हंगामातील नव्या जबाबदारीसाठी फार वेळ वाट पाहू शकत नाही, वाट पाहा, असं म्हटलं होतं. महेंद्रसिंह धोनी यानं भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं त्यावेळी जो लूक आता देखील केला आहे.

संबंधित बातम्या : 

 ऋतुराजकडे चेन्नईची धुरा, याआधी कोणत्या मराठमोळ्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये केलेय नेतृत्व?

MS Dhoni : सगळं ठरलेलं होतं? चेन्नईचं नेतृत्त्व ऋतुराजकडे, धोनीनं फेसबुक पोस्टमधून दिलेले संकेत

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts