Union minister Ramdas Athawale car accident near Wai Satara

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सातारा: केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या गाडीचा गुरुवारी साताऱ्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्यातील वाई परिसरात हा अपघात घडला. रामदास आठवले (Ramdas Athawale) हे आपल्या कारने साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत होते. यावेळी वाई परिसरात त्यांची कार एका कंटेनरला जाऊन धडकली. या धडकेत कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. परंतु,सुदैवाने या अपघातामध्ये रामदास आठवले यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts