IPL 2024: RCB Vs CSK, Pitch Report: The first match between CSK and RCB will be played at the Chepauk Stadium in Chennai. The pitch of this ground is very effective for spinners.

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2024: RCB Vs CSK, Pitch Report:  चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात आज  आयपीएल 2024 ची लढत होणार आहे. सायंकाळी 7.30 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. 

नवे सत्र, नवा कर्णधार चेन्नई सुपरकिंग्जसाठी यंदाच्या आयपीएलची सुरुवात धक्कादायक ठरली. स्पर्धेला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधीच महेंद्रसिंग धोनी कर्णधारपदावरून दूर झाला आणि त्याने संघाच्या नेतृत्वाची धुरा मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपविली. 

खेळपट्टी कशी असेल?

सीएसके आणि आरसीबी यांच्यातील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अतिशय प्रभावी ठरते. चेन्नईच्या मैदानावर बहुतेक कमी स्कोअरिंग सामने पाहिले जातात. चेन्नईकडे मोईन अली, रवींद्र जडेजा आणि महिष तिक्षानासारखे काही दर्जेदार फिरकीपटू आहेत, जे आरसीबीच्या आक्रमक फलंदाजांपुढे समस्यांचे कारण बनू शकतात.

चेपॉकमध्ये आरसीबीचे आकडे खराब

आयपीएल 2008 च्या हंगामात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध केवळ 126 धावा केल्या होत्या, परंतु तरीही ते बचाव करण्यात यशस्वी ठरले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 14 धावांनी विजयी झाला होता. मात्र त्यानंतर चेपॉक स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला यश मिळालेले नाही. चेपॉकमध्ये दोन्ही संघ 7 वेळा आमनेसामने आले, परंतु प्रत्येक वेळी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव झाला. 

चेन्नईचं आरसीबीवर वर्चस्व-

आयपीएलच्या इतिहासात दोघांमध्ये 31 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये सीएसकेने 20 जिंकले आहेत. तर, आरसीबीने केवळ 10 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. चेपॉकमध्ये दोन्ही संघांनी 8 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये चेन्नईने 7 जिंकले आहेत, तर बेंगळुरूने फक्त 1 सामना जिंकला आहे. 

RCB Vs CSK संभाव्य Playing XI:

Royal Challengers Bengaluru : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, दिनेश कार्तिक, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरर, रीस टूली, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा

Chennai Super Kings: रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डॅरिल मिशेल, एमएस धोनी, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान

संबंधित बातम्या:

CSK vs RCB Score Live IPL 2024: क्रिकेटचा महासंग्राम सुरु होणार; आज चेन्नई सुपरकिंग्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू भिडणार

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts