Sharad Pawar says I will never contest elections Pune or Madha Lok Sabha Constituency Maharashtra Political Updates in Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sharad Pawar On Election : पुणे : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीनं अटक केली. याचा मी निषेध करतोय, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, राज्याच्या राजकारणाबाबतही शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आपण माढातून निवडणूक लढवणार (Madha Lok Sabha Constituency) नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार स्वतः पुणे किंवा माढातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. अशातच आता स्वतः शरद पवारांनी या चर्चांना पूर्णविराम देत, मी यापुढे कधीच निवडणूक लढवणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, “ईडी, सीबीआय या एजन्सींचा गैरवापर सध्या सुरु आहे. अकाऊंट फ्रिज करणं यातून देशाचा मोठ्या पक्षाचा प्रचार थांबवण्याचा प्रयत्न होतोय. झारखंडचे मुख्यमंत्र्यांनाही अटक केली, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं जातयं, कारवाई केली जातेय. देशात कोणत्याही पक्षात अशी कारवाई झाली नव्हती, राज्याच्या प्रमुखांना अटक करणं चुकीचं आहे. हे धोरण चुकीचं आहे, हे लाजिरवाणं सरकार आहे. सत्येचा गैरवापर करणं या सगळ्या गोष्टींचा मी निषेध करतो.” तसेच, अरविंद केजरीवाल्यांच्या मागे ताकदीनं उभं राहणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. 

“एका चांगल्या माणसाला तुम्ही तुरुंगांत टाकतात. लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरु आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे. 100 टक्के निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे. झारखंड झालं, दिल्ली झालं अशाच पद्धीतीनं कारवाई होते, उद्या देशभरात होईल.”, असं शरद पवार म्हणाले. 

माढ्याच्या जागेसाठी पवारांच्या मनातील उमेदवार कोण?

माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी, ही माझी वैयक्तीक मागणी आहे. मात्र सगळ्यांनी ऐकली पाहिजे. ज्योती मेटे यांच्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. आमच्याकडे आणखी लोक येतील, महायुतीची जागा निश्चित झाल्यावर आणखी माणसं येतील, असं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच, यावेळी बोलताना यापुढे आपण कधीच निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. आपण माढातून निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. 

“आतापर्यंत या देशात काही अपवाद वेगळले तर निवडणूक मोकळ्या वातावरणात झाल्या आहेत. निवडणूक किती फेअर होईल या याबद्दल शंका आहे. संस्थांचा वापर केला जातोय, काँगेसची खाती गोठवली, देशातील महत्त्वाच्या पक्षाला साधनसामग्री नाही. याआधी अस कधी झालं नाही. विरोधी पक्षाच्या लोकांवर ईडी किंवा इतर संस्थांचा वापर होत आहे. केजरीवाल यांना वाटत होतं की काहीतरी होईल, केजरीवाल यांना अटक केली. त्यांनी धोरण तयार केलं तो त्यांचा अधिकार आहे. त्यांचे धोरण चुकले असेल तर लोकांसमोर जावा, कोर्टात जावा पण तसे न करता त्यांना अटक केली हे चुकीचं आहे.”, असं शरद पवार म्हणाले. 

“मुख्यमंत्री यांना अटक करण्यापर्यत हे सरकार पोहोचले आहे. केजरीवाल यांना अटक झाली याचा अर्थ केजरीवाल यांच्या 100 टक्के जागा निवडून येतील. मागच्यावेळी त्यांच्या 2 जागा आल्या आता तेवढ्या देखील येणार नाही. जे आणिबाणीत झालं नाही ते आता होतं आहे. इंडिया म्हणून त्यांना पाठीशी आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरू आहे. 80 ते 90 टक्के लोकांना केजरीवाल यांना लोकांची पसंती आहे. इलेक्टोरल बॉण्डवर सरकार गप्प आहे. सगळे पैसे त्यांना मिळाले आहेत. जमा करायचं जे जमा केलं आहे, म्हणून भाजप गप्प बसली. सुप्रीम कोर्टालासुद्धा भाजप कारण द्यावं लागतंय. राज ठाकरे किती जागा लढवतील, हे पाहावं लागेल. अजित पवार गटाकडून इन्कमिंग आणखी वाढेल. समोरच्या बाजूने उमेदवार घोषित झाले की आणखी वाढेल.”, असं शरद पवार म्हणाले. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts