होळीच्या सणात झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई होणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

होळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. होळीनिमित्त महापालिकेने नागरिकांना झाडे न तोडण्याचे आवाहन केले आहे. बेकायदेशीरपणे झाडे तोडताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा आणि पोलिसात तक्रार करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

तसेच, होळीच्या काळात झाडे तोडली जात असल्यास महापालिका अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्याला कळवावे, असे आवाहन बीएमसी पार्कचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. महापालिकेशी 1916 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे परदेशी यांनी सांगितले.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संवर्धन आणि संरक्षण अधिनियम, 1975 च्या कलम 21 अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे हा गुन्हा आहे.

झाडे तोडण्याच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीला 1000 ते 5000 रुपये दंड ठोठावण्याची तरतूद आहे. यासोबतच एका आठवड्यापासून एक वर्षांपर्यंत कारावासही होऊ शकतो. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.


हेही वाचा

मीरा-भाईंदरच्या स्थानिकांचा उत्तनच्या प्रमुख मैदानावर हेलिपॅड बांधण्यास विरोध


टीबीच्या औषधांचा तुटवडा, केंद्राचे महत्त्वाचे निर्देश

[ad_2]

Related posts