Mumbai Indians Get New Match Winner And Rohit Sharma Is In No Tension ; बुमरा-आर्चर संघाबाहेर तरीही रोहितला नो टेंशन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लखनौ : जसप्रीत बुमार संघात नाही, त्याच्या जागी आलेला जोफ्रा आर्चर हा आता यापुढे आयपीएल खेळ शकणार नाही. मुंबईच्या चाहत्यांसाठी हे एकामागून एक मोठे धक्के होते. पण हे दोघेही संघात नसले तरी मुंबईच्या संघाला आता एक चांगलाच गेमचेंजर मिळाला आहे. त्यामुळे बुमरा-आर्चर संघात नसले तरी रोहितला मात्र आता कसेलच टेंशन नसल्याचे पाहायला मिळत आहे.बुमरा हा मुंबईच्या संघाला सुरुवातीच्या षटकांमध्ये हमखास विकेट्स मिळवून द्यायचा. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्येही तो भेदक गोलंदाजी करायचा. पण दुखापतीमुळे या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही, हे स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच समजले होते. त्यामुळे त्याच्या जागी मुंबईच्या संघाने जोफ्रा आर्चरला संधी दिली होती. जोफ्रा यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या संघात होता आणि तो बुमरासारखीच गोलंदाजी करत होता. त्यामुळे त्याला मुंबईच्या संघाने मोठी किंमत मोजत संघात घेतले होते. पण तोदेखील दुखापतग्रस्त झाला आणि मुंबईचे टेंशन वाढले. खासकरून रोहित शर्माचे. कारण आता मुंबईसाठी असा गोलंदाज कुठून आणायचा, हा सर्वात मोठा प्रश्न होता. पण यया दोघांची कसर आता एकाच गोलंदाजाने भरून काढली आहे आणि तो आता मुंबईसाठी गेमचेंजर ठरत आहे.

मुंबईने आर्चर खेळू शकत नाही हे समजल्यावर एका खेळाडूला संधी दिली आणि त्यांनी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. संघाने त्याला सातत्याने संधी दिली आणि या संधीचे सोने त्याने आता केले आहे. मुंबईसाठी गेमचेंजर ठरत आहे तो वेगवान गोलंदाज जेसन बर्डनहॉफ. लखनौच्या सामन्यातही जेसनने अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. जेसनने तिसऱ्या षटकातच सलामीवीर दीपक हुडाला पाच धावांवर बाद केले. त्यानंतरच्याच चेंडूवर जेसनने गेल्या सामन्यात मॅचविनर ठरलेल्या प्रेरक मांडकला शून्यावर बाद केले. जेसनने एकामागून एक दोन धक्के दिल्यावर लखनौचे कंबरडे चांगलेच मोडले. जेसन या आयपीएलमध्ये सातत्याने अचूक आणि वेगवान गोलंदाजी करत आहे. त्यामुळे आता संघाच्या गोलंदाजीचे सारथ्य कोण करेल, याची चिंता नसेल.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

मुंबई इंडियन्सने लखनौची या सामन्यात जेसनमुळे २ बाद १२ अशी दयनीय अवस्था केली होती.

[ad_2]

Related posts