Chitra Wagh Bjp leader attack on Praniti Shinde Congress MLA for Blaming Bjp Maharashtra Politics detail marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chitra Wagh on Praniti Shinde :  काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेसाठीच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना गुरुवारी (दि.22) पंढरपुरात कथित मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर प्रणिती शिंदे यांना संताप अनावर झाला होता. दरम्यान, हा हल्ला भाजपच्या गुंडांनी केला होता, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रणिती शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

प्रणिती शिंदे यांना नुकतच काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. त्या मुद्द्याला धरुन प्रणिती शिंदेंवर चित्र वाघ यांनी हल्लाबोल केला. दरम्यान यावर प्रणिती शिंदे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. 

चित्रा वाघ यांनी काय म्हटलं?

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलं की, काही जण निवडणूक जिंकण्यासाठी जनतेपर्यंत जातात आणि त्यांची कामं करतात. काही जणांना शॉर्ट कट मारायचा असतो. ते स्टंट करतात. अशाच आमच्या एका स्टंटबाज भगिनींचा व्हिडिओ फिरवला जातोय. त्या भगिनी म्हणजे आपल्या सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणितीताई शिंदे झालं असं की, कुठून तरी सभेवरून येत असताना ताईंची गाडी अडवण्यात आली. आता आपल्या कामांसाठी जनता लोकप्रतिनिधींकडे जाणार नाही मग कुणाकडे जाणार ? काही समाजबांधवांच्या आपल्या मागण्यांसंदर्भात तीव्र भावना होत्या. त्या त्यांनी प्रणितीताईंच्या कानावर घातल्या. बिचारे थोडे संतापलेले होते. तेही साहजिक आहे. ही मंडळी काय म्हणताहेत, हे त्या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय. त्यांची नेमकी मागणी काय आहे, तेही समजतंय.

‘त्यांना गुंड म्हणणे तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही’

पण या लोकांवरच गुरकावून त्या फणकाऱ्यानं गाडीत बसून चालत्या झाल्यात. नंतर त्या आरोप करत सुटल्यात की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केला. आपल्यावर हल्ला करणारे भाजपचे गुंड होते. मला स्पष्ट करायचंय की, एक तर ही लोकं भाजपचे कार्यकर्ते तर अजिबातच नव्हते. शिवाय, आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त केल्या म्हणून जे कुणी ते लोक आहेत, त्यांना गुंड म्हणणे तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही.प्रणितीताई, तुम्ही माजी मुख्यमंत्र्यांची लेक आहात. आपल्याकडे गाऱ्हाणी घेऊन आलेल्यांच्या समस्या त्यांनी कशा सोडवल्या, हे जरा त्यांना विचारा. उगीच स्वस्त प्रचाराच्या मोहात गुरफटून भाजपला टारगेट करू नका. गुंड पाळणं ही भाजपची संस्कृती नाही. गुंड पाळणाऱ्या पक्षांना आम्ही घरी बसवलंय. त्यामुळे बेछूट आरोप कराल तर तशाच भाषेत उत्तर देऊ, असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

ही बातमी वाचा : 

Supriya Sule on PM Narendra Modi : नमो रोजगार मेळाव्याचा मंडप 5 कोटींचा होता, सुप्रिया सुळेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts