ipl 2024 pbks vs dc match playing xi pitch report match prediction and key details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PBKS vs DC नवी दिल्ली: आयपीएलच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील दुसऱ्या सामन्यात 23 मार्चला पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Captials) आमने सामने येणार आहेत. दिल्ली आणि पंजाब यांच्यातील लढत महाराजा यदाविंद्र सिंह स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलच्या 16 व्या पर्वात दिल्ली आणि पंजाब दोनवेळा आमने सामने आले होते. त्यावेळी दोन्ही संघांनी एक एक वेळा मॅच जिंकली होती. मात्र, यावेळी परिस्थिती  वेगळी आहे. दिल्लीच्या टीममध्ये रिषभ पंतचं कमबॅक झालं आहे. दिल्लीपुढं शिखर धवनच्या पंजाब किंग्जचं आव्हान असेल.  

पिच रिपोर्ट

महाराजा यदाविंद्र स्टेडियममध्ये आयपीएलची पहिलीच मॅच खेळवली जात आहे.यापूर्वी या मैदानावर झालेले इतर सामने  कमी धावसंख्येचे झाल्यानं या मैदानावरील पीचला लो स्कोअरिंग पीच म्हणनं चुकीचं ठरणार नाही.  टॉस जिंकणाऱ्या संघाला पहिल्यांदा बॅटिंग करण्यात अडचण येणार नाही. फलंदाजांना चौकार षटकार मारण्यात अडचणी येऊ शकतात. या पीचवर गोलंदाज अधिक भेदक मारा करण्याची शक्यता आहे. दिल्लीकडे अक्षर पटेल आणि कुलदीप यादव सारखे दोन आंतरराष्ट्रीय स्पिनर आहेत. जे पंजाबपुढं अडचणी निर्माण करु शकतात. 

मॅच प्रेडिक्शन

पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएलच्या इतिहासात 32 वेळा आमने सामने आले आहेत. ज्यामध्ये दोन्ही संघांनी 16-16 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. गेल्या सीझनमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एका मॅचमध्ये विजय मिळवला होता. आकडेवारी पाहिली असता पंजाब आणि दिल्ली कट्टर प्रतिस्पर्धी मानले जात आहेत. 

पिच रिपोर्टच्या अंदाजानुसार मॅच लो स्कोअरिंग राहू शकते. यामुळे दोन्ही संघांच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी राहू शकते. दिल्लीकडे कगिसो रबाडा, हर्षल पटेल, राहुल चहर हे बॉलर्स आहेत. याशिवाय त्यांच्याकडे इशांत शर्मा, आंद्रे नॉर्खिया, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांच्यासारखे इतर बॉलर्स देखील आहेत.  

दरम्यान, पंजाब आणि दिल्ली दोन्ही संघांना आतापर्यंत आयपीएलच्या एकाही पर्वात विजेतेपद पटकावता आलेलं नाही. दोन्ही संघ विजयानं यंदाच्या आयपीएलमधील प्रवास सुरु करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील. 

पंजाब किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, जॉनी बेयरस्टो, लियम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सैम कर्रन, ऋषि धवन, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहार, अर्शदीप सिंह.

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत ( कर्णधार आणि विकेटकीपर), ट्रस्टन स्टब्स, ललित यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मुकेश यादव, आंद्रे नॉर्खिया.

संबंधित बातम्या :

चेन्नईसाठी गुड न्यूज, आरसीबी विरुद्धच्या मॅचपूर्वी स्टार वेगवान बॉलर फिट, ऋतुराजचं टेन्शन मिटलं

 

Video : IPL इतिहासात असा ‘विराट’ कॅच होणे नाहीच! रहाणेचा कॅच पाहून डोळ्यांवर विश्वास बसेना

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts