Manoj Jarange karmala sabha Madha Lok Sabha Election on maratha reservation solapur protest maharashtra politics marathi news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोलापूर: एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची सोलापुरातील करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाण येथे तोफ धडाडणार आहे. त्यामुळे जरांगे काय बोलणार, ते काय संदेश देणार या भीतीने माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha Election) उमेदवार आणि राजकीय नेते गॅसवर असल्याचं चित्र आहे. 

करमाळा तालुका हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो. सध्या माढ्याच्या तिढ्याने भाजपाची डोकेदुखी वाढली असताना आता जरांगे सभेत काय बोलणार या भीतीने सर्वच राजकीय नेत्यांना धास्ती लागून राहिली आहे. मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. 

मनोज जरांगे काय बोलणार याची धास्ती 

दोन दिवसापूर्वी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे याना पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे सकल मराठा तरुणांनी आरक्षणासाठी रोखले होते. त्यावेळी प्रणिती शिंदे यांनी आपल्या कारवर भाजपच्या गुंडानी हल्ला केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर यावर बरेच वादंग माजले होते. त्यावर आमचं ध्येय हे आरक्षण असून आम्ही सर्वच पक्षांच्या नेत्यांना अडवतोय असं मराठा आंदोलकांनी सांगिल्यानंतर भाजपने सुटकेचा निश्वास टाकला होता. पण आज मनोज जरांगे काय बोलणार याची धास्ती मात्र भाजपसह इतर सर्वच पक्षांच्या नेत्यांना लागलीय.

मनोज जरांगेंची विशाल सभा

मनोज जरांगे दुपारी चार वाजता करमाळ्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या दिवेगव्हाण येथे येत असून येथे 70 एकरावरील जागेत त्यांच्या विशाल सभेचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या माढा लोकसभेत भाजपचे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांनी या उमेदवारीला विरोध करीत धैर्यशील मोहिते पाटील आणि कुटुंबीय प्रचारात उतरले आहेत. 

मोहिते पाटील यांनी तुतारी घेऊन शरद पवार यांच्या पक्षात जावे यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढत चालला आहे. मोहिते पाटील निर्णय घेत नसल्याचे पाहून शरद पवार यांनी माढा लोकसभेसाठी धनगर नेते महादेव जानकर यांची उमेदवारी निश्चित केली आहे. 

मनोज जरांगे काय सिग्नल देणार? 

या सर्व घडामोडी तापत असताना आज मनोज जरांगे काय सिग्नल देतात याकडे मराठा समाजाचे लक्ष लागून राहिले आहे. जरांगे यांच्याकडून सातत्याने भाजप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुरु असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मनोज जरांगे कोणावर टीका करतात यावर माढा लोकसभेचे भवितव्य अवलंबून असणार असल्याचं दिसतंय. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts