IPL 2024: Virat Kohli waving at the ‘Virat, Virat’ chants in MA Chidambaram Stadium, Chennai

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Latest Marathi News: CSK Vs RCB: IPL 2024: गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जने (Chennai SuperKings) आयपीएलच्या 17व्या सत्रात विजयी सलामी देताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला ((Royal Challengers Bengaluru)) 6 गड्यांनी नमवले. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. त्याने 4 षटकांत 29 धावा देत 4 विकेट्स पटकावल्या. 

सीएसके आणि आरसीबीच्या या सामन्यात काही क्षण चाहत्यांना खूप आवडले. त्यामधील एक विराट कोहली आणि एमएस धोनीची झालेली भेट. विराट कोहली फलंदाजी करताना धोनीच्या खांद्यावर हात ठेवून काहीतरी त्याला सांगितले. यावर धोनीने देखील स्मितहास्य देत प्रतिसाद दिला. चेन्नईने सामना जिंकल्यानंतरी कोहली आणि धोनीची भेट झाली. यावेळीचा व्हिडिओ देखील आयपीएलच्या अधिकृत पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. 

विराट कोहलीचा देखील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएल 2024चा पहिला सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यात झाला. हा सामना चेन्नईतील चिंदबरम (चेपॉक) मैदानावर आयोजित करण्यात आला होता. चेपॉक मैदान धोनीचा बालेकिल्ला मानला जातो. चाहत्यांनी या मैदानात कोहली-कोहली असे नारे दिले. यावेळी कोहलीने देखील चाहत्यांना हात दाखवत आभार मानल्याचे या व्हिडिमध्ये दिसून येत आहे. 

दोघांची घट्ट मैत्री-

कोहली आणि धोनी हे जिवलग मित्र आहेत. भारतीय संघासाठी एकत्र खेळताना त्यांच्यात एक घनिष्ठ मैत्री झाली. 2022 मध्ये जेव्हा त्याने धावांसाठी संघर्ष केला आणि कसोटी कर्णधारपदाचा त्याग केला तेव्हा त्याच्या कठीण काळात फक्त धोनीने विराटला कॉल केला होता. याबाबत स्वत: विराटने माहिती दिली होती. कोहलीने 2008 आणि 2019 दरम्यान 11 वर्षे धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली. तो म्हणतो की धोनी, जो क्वचितच त्याचा फोन वापरतो, त्याने त्याच्या कठीण काळात त्याला दोनदा कॉल केला आणि काही महत्त्वाच्या टीप्स दिल्या, असं विराटने सांगितले होते. 

संबंधित बातम्या:

CSK Vs RCB: ‘दोन-तीन गोष्टींवर काम करायचंय’; सामना जिंकल्यानंतरही ऋतुराज नाखुश, नेमकं काय म्हणाला?
 IPL 2024: 18 मार्चला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर गेला, 4 दिवसांनी परतला अन् चेन्नईला विजय मिळवून दिला
PBKS vs DC Score Live IPL 2024: दिल्ली कॅपिटल्स आज पंजाब किंग्सविरुद्ध भिडणार; ऋषभ पंतकडे चाहत्यांचं लक्ष

अधिक पाहा..



[ad_2]

Related posts