ipl 2024 kkr vs srh match playing xi pitch report match prediction and other key details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

KKR vs SRH : आयपीएलचा (IPL 2024) तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सरायजर्स हैदाराबाद (SRH) संघामध्ये होणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मागील हंगामात दोन्ही संघ दोन सामन्यात एकमेंकाविरोधात भिडले होते. त्यामध्ये प्रत्येकी एक एक विजय मिळवला होता. आजचा सामना खास यासाठीही आहे की ऑस्ट्रेलियाचे दोन दिग्गज गोलंदाज आमनेसामने असतील. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात महागडे खेळाडू आहेत. त्याशिवाय कोलकात्याचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे, तर हैदराबादची धुरा पॅट कमिन्सच्या खांद्यावर असेल. दोन्ही संघ विजयाने सुरुवात कऱण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पिच रिपोर्ट आणि प्लेईंग 11 बद्दल जाणून घेऊयात..

पिच रिपोर्ट 

कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर हैदराबाद आणि केकेआर यांच्यातील सामना होणार आहे. हा सामना हाय स्कोरिंग होण्याची शक्यता आहे. कारण, कोलकात्याची खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. याआधी प्रत्येक कर्णधारांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. यंदाही नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. गोलंदाजीबाबत बोलायचं झाल्यास ईडन गार्डन मैदानावर फिरकीला साथ मिळेल. कोलकात्याकडे तीन क्वालिटी स्पिनर आहेत. या सामन्यात पहिल्या डावात 180 पेक्षा जास्त धावा निघू शकतात. 

हेड टू हेड – 

आयपीएलच्या इतिहासात हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात 25 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये 16 सामन्यात कोलकात्याने विजय मिळवलाय. हैदराबादला फक्त नऊ सामन्यातच बाजी मारता आली आहे. आजच्या सामन्यातही केकेआरचं पारडे जड दिसतेय. रहमनुल्लाह गुरबाज, श्रेयस अय्यर, नितीश राणा आणि रिंकू सिंह यासारखे स्फोटक फलंदाज आहेत. तर हैदाराबादकडेही ट्रेविस हेड, एडन मार्क्रम, हेनरिक क्लासेन यासारखे फलंदाज आहेत. त्यामुळे सामना रंगतदार होऊ शकतो.  

कोलकाता नाइट रायडर्सची संभाव्य प्लेईंग 11  : 

रहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

सनरायजर्स हैदराबादची संभाव्य प्लेईंग 11  :

ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्क्रम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, पॅट कमिन्स (कर्णधार), शहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

आणखी वाचा :

KKR vs SRH सामन्यात या खेळाडूंवर लावा पैसा, 11 खेळाडू तुम्हाला करतील मालामाल

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts