pbks vs dc abhishek porel hit three fours and two six in harshal patel over

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2024  : दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आयपीएलची (IPL 2024) दुसरी लढत सुरु आहे. पंजाब किंग्जनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. दिल्लीच्या सातत्यानं विकेट पडत गेल्या. दिल्लीचा संघ 150 धावा करेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, दिल्लीचा युवा खेळाडू अभिषेक पोरेल (Abhishek Porel) यानं 10 बॉलमध्ये 31 धावा केल्यानं पंजाब किंग्जपुढं विजयासाठी 175 धावांचं आव्हान उभं राहिलं. 

अभिषेक पोरेलची वादळी खेळी

दिल्लीकडून लोअर मिडलला खेळणाऱ्या अभिषेक पोरेलनं अखेरच्या ओव्हरमध्ये 25 धावा काढल्या. हर्षल पटेलला त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये 3 चौकार, दोन षटकार मारले. याच्या जोरावर त्यानं 10 बॉलमध्ये 31 धावा केल्या. अभिषेक पोरेलच्या खेळीनं दिल्लीचा संघ 20 ओव्हरमध्ये 9 बाद 174 धावा करु शकला.

कोण आहे अभिषेक पोरेल?

अभिषेक पोरेल याला दिल्लीच्या संघ व्यवस्थापनानं रिषभ पंतची रिप्लेसमेंट म्हणून संघात घेतलं होतं. दिल्ली कॅपिटल्सनं रिषभ पंत अपघातात जखमी झाल्यानंतर अभिषेक पोरेलला संधी दिली होती. अभिषेक पोरेल यानं 2023 च्या आयपीएलमध्ये दिल्लीसाठी 4 मॅच खेळल्या होत्या. मात्र, त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. यावेळी एकाच ओव्हरमध्ये 25 धावा काढून अभिषेकनं त्याची क्षमता दाखवून दिली आहे. 
 
अभिषेक पोरेल हा मूळचा बंगालचा विकेटकीपर बॅटसमन आहे. बंगालच्या संघाकडून तो देशांतर्गत क्रिकेट खेळतो. भारताच्या टीमनं अंडर -19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्या संघाचा तो सदस्य होता. पोरेल यानं 2022 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं. 

अभिषेक पोरेलची आयपीएल कारकीर्द

अभिषेक पोरेल याला दिल्लीकडून 2023 च्या आयपीएलमध्ये केवळ 4 सामन्यांमध्ये संधी मिळाली होती. त्या चार सामन्यांमध्ये अभिषेक पोरेल यानं 33 धावा केल्या होत्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 20 इतकी होती. त्यानं आजच्या सामन्यातील फटकेबाजीनंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.अभिषेक पोरेलनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 16 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 695 धावा केल्या आहेत.   

रिषभ पंतला पर्याय म्हणून संघात घेतलं?

रिषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 ला कार अपघात झाला होता. या अपघातानंतर दिल्लीच्या टीमनं विकेटकीपर बॅटसमनचा शोध घेतला होता. दिल्लीच्या टीमचा कोच रिकी पॉटिंगनं अभिषेक पोरेलला संघात संधी दिली होती. गेल्या आयपीएलमध्ये त्यानं चार मॅच खेळल्या होत्या. आता 2024 च्या आयपीएलमध्ये देखील दिल्लीच्या टीम मॅनेजमेंटनं अभिषेक पोरेलला संघात संधी दिली आहे. त्यानं पहिल्याच मॅचमध्ये संधीचं सोन करुन दाखवलं आहे.

संबंधित बातम्या : 

CSK vs RCB: रवींद्र जडेजाचं षटकारांचं शतक पूर्ण, सिक्सर मारणाऱ्यांच्या यादीत पहिलं कोण? रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी

अभिषेक पोरेलचा इम्पॅक्ट, 10 चेंडूत सामना फिरवला, दिल्लीचं पंजाबपुढे 175 धावांचं आव्हान

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts