Manoj Jarange Meeting In Antarwali Sarathi Today Big Announcement About Maratha Reservation in Lok Sabha election time marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange Meeting : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक (Maratha Community Meeting) बोलावली आहे. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतेले जाणार आहेत. सोबतच, 900 एकरवर लवकरच मराठा समाजाची सभा होणार असून, ती सभा कुठे आणि कधी होणार याची देखील घोषणा आजच्या बैठकीत केली जाणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत. सोबतच मनोज जरांगे आज कोणती भूमिका मांडणार हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे. 

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्याकडून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. तसेच, अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्याकडून सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत हल्लाबोल करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता शेवटचा निर्णय घ्यायचा असून, यासाठी 24 मार्च रोजी आंतरवाली सराटीत मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक बोलवण्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे आज राज्यभरातील मराठा समाज आंतरवाली सराटीत बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी घोषणा होणार? 

सगेसोयरे कायद्याची अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंसह मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात आंदोलन केले जात आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारकडून सगेसोयरे कायद्याची अमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी प्रत्येक गावातून दोन मराठा उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत देखील मनोज जरांगे यांच्याकडून निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 

पोलिसांचा मोठा बंदोबस्त….

राज्यात निवडणुकीचे वातावरण आहे. अशात मनोज जरांगे यांची सभा होत आहे. दरम्यान, आज होणाऱ्या आंतरवाली सराटीमधील बैठकीच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. बैठकीच्या अनुषंगाने 200 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोबतच, वरिष्ठ अधिकारी देखील बैठकीच्या ठिकाणी असणार आहे. 

900 एकरच्या सभेची घोषणा होणार…

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी सगेसोयरे कायद्याची अमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे करत आहेत. मात्र, त्यांच्या मागणीला यश येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता मराठा समाजाची 900 एकरवर सभा घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात करण्यात आली आहे. मात्र, ही सभा कुठे आणि कधी होणार याची घोषणा आजच्या बैठकीत केली जाणार आहे. त्यामुळे या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लगले आहेत. कारण या सभेत महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा होणार असल्याने या सभेला अधिक महत्व प्राप्त होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Madha : आधीच माढ्याचा तिढा अन् त्यात आज मनोज जरांगेंची तोफ करमाळ्यात धडाडणार; जरांगे काय सिग्नल देणार? भाजप नेते गॅसवर

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts